You are currently viewing कुडाळ केळबाई स्मशानभूमी येथे हायमास्ट शुभारंभ संपन्न

कुडाळ केळबाई स्मशानभूमी येथे हायमास्ट शुभारंभ संपन्न

कुडाळ
कुडाळ शहरातील नगरपंचायत हद्दीतील कुडाळ केळबाई स्मशानभूमी येथे हायमास्ट बसविणे या कामाचा शुभारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. कुडाळ नगरपंचायतीमार्फत होत असलेल्या विकास कामांपैकी कुडाळ शहरातील केळबाई स्मशानभूमी येथे हायमास्ट बसविणे कार्यक्रम कुडाळ नगरपंचायत चे नगराध्यक्ष ओंकार तेली आणि स्थानिक नगरसेवक गणेश भोगटे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष ओंकार तेली, नगरसेवक सुनील बांदेकर, आबा धडाम, राकेश कांदे, नगरसेवक गणेश भोगटे, राजू भक्षी, नगरसेविका साक्षी सावंत, आश्विनी गावडे, उषा आठले, इब्राहिम शेख,केळबाई वाडीतील ग्रामस्थ महेश राऊळ, प्रसाद वडियेकर, साळुंखे, तुकाराम राऊळ, श्री.मुळीक, श्री.कुंभार, राजन राऊळ, वालावलकर काका, दत्ताराम साळुंखे, प्रसाद वाडयेकर, प्रथमेश केळबाईकर, शैलेश राऊळ, कृष्णा राऊळ, संजय राऊळ, रोहन सावंत उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − ten =