You are currently viewing बॅ. नाथ पै बीएस्सी नर्सिंग महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल

बॅ. नाथ पै बीएस्सी नर्सिंग महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल

कुडाळ :

 

कुडाळ येथील बॅ नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च अकॅडमी कुडाळ जिल्ह्यात अव्वल स्थानी.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी सत्र परीक्षा 2023 चा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च ॲकडमी कुडाळ मध्ये शिकत असणाऱ्या बेसिक बीएस्सी नर्सिंग अंतिम वर्षाचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करून विजयी निकालाची परंपरा कायम राखली आहे. बेसिक बी.एस्सी नर्सिंग अंतिम वर्षासाठी एकूण 25 विद्यार्थी -विद्यार्थिनी प्रविष्ठ झाले होते. ,यात सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उत्तीर्ण होऊन जिल्ह्यात कॉलेजचा निकाल अव्वल स्थानी राखत यशस्वी परंपरा कायम राखली.

यामध्ये कुमारी ऐश्वर्या अन्सुरकर(७८.०८%) गुण मिळवून महाविद्यालयातून प्रथम, कुमारी गौतमी मेस्त्री(७७.०२%) द्वितीय तर कुमारी प्रतीक्षा पारकर हिने (७५.०६%) गुण मिळवून महाविद्यालयात तृतीय येण्याचा मान मिळविला.

या सर्व विद्यार्थी -विद्यार्थिनींनी कौशल्य हॉस्पिटल ठाणे, सर जे.जे. ग्रुप ऑफ हॉस्पिटल भायखळा, मुंबई एस आर सी सी हॉस्पिटल मुंबई, तसेच नानावटी हॉस्पिटल मुंबई इत्यादी नामांकित हॉस्पिटल मधून आपले प्रात्यक्षिक कार्य पूर्ण केले. या सर्व यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनींना नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या मीना जोशी, प्रा कल्पना भंडारी,प्रा. वैशाली ओटवणेकर, प्रा सौ.शांभवी आजगावकर , प्रा सौ.सुमन करंगळे-सावंत, प्रा.प्रणाली मयेकर, प्रा. प्रथमेश हरमलकर तसेच इतर प्राध्यापक वर्गांचे मार्गदर्शन लाभले .सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उप प्राचार्या सौ. कल्पना भंडारी, संस्था मुख्य कार्यकारी अधिकारी सौ .अमृता गाळवणकर तसेच संस्था अध्यक्ष श्री. उमेश गाळवणकर यांनी कौतुक केले.व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 2 =