You are currently viewing एकदिवसीय विश्वचषकासाठी सर्व १० संघ जाहीर

एकदिवसीय विश्वचषकासाठी सर्व १० संघ जाहीर

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

काही दिवसांतच भारतात एकदिवसीय विश्वचषक सुरू होणार आहे. स्पर्धेच्या १३व्या आवृत्तीला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावेळी विश्वचषकात १० संघ सहभागी होणार आहेत. यजमान भारताव्यतिरिक्त गतविजेते इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स खेळणार आहेत. यातील अनेक संघ आधीच भारतात पोहोचले आहेत.

२०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करून विजेतेपद पटकावले. यावेळी जोस बटलरच्या नेतृत्वाखालील संघ आपल्या विजेतेपदाचे रक्षण करेल. आतापर्यंत सर्व १० संघांनी आपापल्या संघांची घोषणा केली आहे. २८ सप्टेंबर ही संघात बदल करण्याची शेवटची तारीख होती. आता कोणत्याही देशाला संघात बदल करण्यासाठी प्रथम आयसीसीची परवानगी घ्यावी लागेल. गुरुवारी, २८ सप्टेंबर रोजी, दोन संघांनी त्यांच्या संघात प्रत्येकी एक बदल केला. यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात अष्टपैलू अॅश्टन अगरच्या जागी फलंदाज मार्नस लॅबुशेनचा समावेश केला आहे आणि भारताने जखमी अष्टपैलू अक्षर पटेलच्या जागी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचा संघात समावेश केला आहे.

*असे असतील १० संघ:-*

*अफगाणिस्तान:-* हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान, नवीन उल हक.

*ऑस्ट्रेलिया:-* पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.

*बांगलादेश:-* शकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तनजी हसन तमीम, नजमुल हुसेन शांतो (उपकर्णधार), तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराज, नसुम अहमद, शाक महेदी हसन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन, मुशफिकर रहिम. महमूद, शरीफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब.

*इंग्लंड:-* जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.

*भारत:-* रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

*नेदरलँड:-* स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामनुरु, पॉल व्हॅन मीकरेन, कॉलिन एकरमन, रॉल्फ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लाइन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शारिझ अहमद, साइब्रांड एंगेलब्रेक्ट.

*न्युझीलँड:-* केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, विल यंग.

*पाकिस्तान:-* बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम.

*दक्षिण आफ्रिका:-* टेम्बा बावुमा (कर्णधार), जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुक्वायो, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रॅस्सी, रॅस्सी, लीडर डुसेन.

*श्रीलंका:-* दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), कुसल परेरा, पथुम निसांका, लाहिरू कुमरा, दिमुथ करुणारत्ने, सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, महिष तिक्षाना, दुनिथ वेलागे, कसुन राजिशाना, माथिलशान, मदशिरा, ड्युनिथ वेल्लागे, दुषण हेमंत आणि राखीव: चमिका करुणारत्ने.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + two =