सत्ताधारी महाविकास आघाडीला भाजपाचा ‘दे धक्का’

सत्ताधारी महाविकास आघाडीला भाजपाचा ‘दे धक्का’

कळसुली ग्रामपंचायतीचे ४ सदस्य कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल

शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, गावपॅनला दिली सोडचिठ्ठी

आम.नितेश राणे यांनी केले स्वागत

कणकवली प्रतिनिधी :-
सत्ताधारी महाविकास आघाडीच्या कळसुली ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी भारतीय जनता पार्टीत, पक्ष प्रवेश केला. एकाच ग्रामपंचायतच्या चार सदस्यांचा कार्यकर्त्यांसह भाजपात झालेला हा प्रवेश म्हणजे सत्ताधारी आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला फारमोठा धक्का मानला जात आहे. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थिती हा पक्ष प्रवेश करण्यात आला.
यावेळी भाजपात प्रवेश केलेल्या ग्रामपंचायत सदस्य श्रद्धा दीपक मेस्त्री, मयुरी महेश देसाई, विकास रामचंद्र कदम, दीपक शांताराम मेस्त्री, कार्यकर्ते प्रसाद अंकुश तेली, योगेश मेस्त्री यांचे भाजपाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत आम.नितेश राणे यांनी केले. यावेळी भाजपा उपाध्यक्ष शशी राणे, पंचायत समिती सदस्य सुचिता दळवी, मिलिंद मेस्त्री, समीर सावंत, ग्रामपंचायत सदस्य सचिन परधीये, श्रुती नार्वेकर, किशोर घाडीगांवकर, राजू नार्वेकर, शामराव दळवी, हेमंत वारंग, योगेश मस्त्री, पंढरी शिरवलकर, श्री.किंजवडेकर, आदी उपस्थित होते.
राणेंच्या नेतूत्वाखालीच कळसुली गावाचा विकास होईल त्यासाठी आम्ही भाजपात प्रवेश केला आहे. आम. नितेश राणे या मतदार संघाचे आमदार म्हणून करत असलेली विकास कामे आणि सोडवत असलेले जनतेचे प्रश्न आम्ही पाहत आहोत त्यामुळे राणेंच्या नेतूत्वाखाली गावाचा विकास होईल असा विश्वास यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा