You are currently viewing दोडामार्गात मोकाट गुरांचा पहिला बळी

दोडामार्गात मोकाट गुरांचा पहिला बळी

गुरांच्या हल्ल्यात कसई येथील “विष्णू फाटक” यांचा दुर्देवी मृत्यू

दोडामार्ग

नगरपंचायत कसई दोडामार्ग चे मोकाट गुरांकडे होत असलेले दुर्लक्ष आता नागरिकांच्या जीवावर उठत असून दोन दिवसांपूर्वी मोकाट गुरांनी हल्ला केल्याने जखमी असलेले कसई येथील विष्णू फाटक यांची उपचारा दरम्यान प्राणज्योत मालवली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सेवा निवृत्त असलेले विष्णू फाटक हे संध्याकाळच्या वेळी बाजारपेठेत गेले असताना मराठी शाळा न ०१ धाटवाडी येथे आले असता मोकाट गुराने त्यांच्यावर हल्ला केला, या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातून गोव्यात मणीपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. यावेळी कसई दोडामार्ग गावावर शोककळा पसरली आहे तर नगरपंचायत प्रशासना विरोधात ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

कसई दोडामार्ग नगरपंचायत क्षेत्रात मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर आहे. मात्र नगरपंचायतचे साफ दुर्लक्ष या प्रश्नाकडे होते आहे. आता पर्यंत ही गुरे बाजारात नुकसान तसेच अपघातास कारणीभूत ठरत होती मात्र आता या मोकाट जनावरांमुळे लोकांचे जीव जात असल्याने यावर कायमस्वरूपी उपाययोजना होणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + nine =