You are currently viewing स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास 31 मे पर्यंत मुदतवाढ

स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास 31 मे पर्यंत मुदतवाढ

स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास 31 मे पर्यंत मुदतवाढ

– सहाय्यक आयुक्त दीपक घाटे

सिंधुदुर्गनगरी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2021-22 या शैक्षणिक वर्षांकरीता अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्याना  31 मार्च 2022 पर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली होती. तथापि सन 2021-2022 या शैक्षणिक  वर्षातील वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रीया अजूनही सुरु असल्याने या योजनेअंतर्गत पात्र गरजू लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी  विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यासाठी दिनांक 31 मे 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − ten =