You are currently viewing कलादिग्दर्शक रुपेश नेवगी यांचा डी कॅडच्या वतीने सन्मान

कलादिग्दर्शक रुपेश नेवगी यांचा डी कॅडच्या वतीने सन्मान

मालवण :

 

क्रेडार संचलित डी कॅड देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन यांच्यावतीने येथील कलाशिक्षक, वाळू शिल्पकार, कलादिग्दर्शक रुपेश नेवगी यांच्या कार्याची दखल घेत मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन देवरुख येथे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध चित्रकार प्रकाश राजेशिर्के, प्रख्यात चित्रकार भारती पित्रे, डी कॅडचे अध्यक्ष अजय पित्रे, प्राचार्य रणजीत मराठे, जे जे स्कूल ऑफ आर्टच्या सीमा कुंजने उपस्थित होते. या सन्मानाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा