You are currently viewing वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्गची शासकीय विश्रामगृह कुडाळ येथे होणार बैठक

वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्गची शासकीय विश्रामगृह कुडाळ येथे होणार बैठक

कुडाळ :

 

वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्गचे पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मुंबई येथे जात महावितरणचे संचालक श्री.विश्वास फाटक साहेबांची भेट घेतली होती. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणच्या भोंगळ कारभाराविरुद्ध अनेक तक्रारींचे निवेदन सन्माननीय फाटक साहेबांना देण्यात आले होते. श्री.फाटक साहेबांशी जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या समस्यांबाबत झालेल्या सकारात्मक चर्चेच्या अनुषंगाने शनिवार दि.09 सप्टेंबर रोजी सायं 4.00 वा. शासकीय विश्राम गृह कुडाळ येथे वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग जिल्हा व सर्व तालुका कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. यावेळी खालील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा व निर्णय घेतला जाणार आहे.

1) मागील सभेचा वृत्तान्त वाचून कायम करणे.

2) सर्व तालुका संघटना कार्यकारिणी समितीस मान्यता देणे.

3) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिडीत वीज ग्राहकांच्या समस्या आणि अडचणी याबाबतचा उपविभाग निहाय तपशीलवार आढावा घेणे.

4) 15 ऑक्टोबर पूर्वी सर्व 10 उपविभाग निहाय वीज ग्राहक मेळाव्याच्या आयोजनाबाबत चर्चा करून निर्णय घेणे.

5) अकार्यक्षम, मुजोरगिरी करणाऱ्या वीज अधिकाऱ्यांच्या बाबतीत ऊर्जा मंत्री, CMD, CE यांच्याकडे तक्रार दाखल करण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेणे.

6) जिल्हा संघटनेत आवश्यक ते बदल करणे.

या बैठकीसाठी सर्व जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन वीज ग्राहक संघटना जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव, जिल्हा समन्वयक, जिल्हा उपाध्यक्ष यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा