You are currently viewing सामाजिक न्यायाच्या विरोधात अन्यायकारक शासन निर्णयास कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा विरोध

सामाजिक न्यायाच्या विरोधात अन्यायकारक शासन निर्णयास कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा विरोध

उद्याच्या शाळा बंद आंदोलनाला संघटनेचा पाठिंबा

राज्य सरचिटणीस आकाश तांबे यांची माहिती

तळेरे

राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः/ पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची दि. २५ नोव्हेंबर २००५ पासून पद भरती करण्यात आलेली नाही. त्यात ११डिसेंबरला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कायम पद भरती रद्द करण्यात येणार असल्याचा अन्याकारक घेतलेला निर्णया त्वरीत रद्द करण्याची लेखी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस आकाश तांबे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
राज्यात मोठया प्रमाणात मागासवर्गीयांचा भरतीमधील अनुशेष शिल्लक आहे. राज्यातील मागास समाजातील अनेक प्रवर्गाना शासकीय सेवेत पुरसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही. राज्यातील अनेक जाती आरक्षणासाठी संघर्ष करत आहे.
मात्र आपल्या या निर्णयाने आरक्षण धोरणच संपुष्टात आले आहे, सामाजिक न्यायालयाला तिलांजली दिली आहे.
11डिसेंबरच्या शासन निर्णय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय कारक असून राज्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम करणारा आहे. शिक्षणक्षेत्रात वेठबिगारी आणणारा शासननिर्णय त्वरित रद्द करावा अन्यथा संघटना तीव्र आंदोलन छेणार आहे असाही इशारा राज्य अध्यक्ष कृष्णा इंगळे , कार्याध्यक्ष रविंद्र पालवे व सरचिटणीस आकाश तांबे यांनी दिली आहे.

शिक्षण संस्था मंडळाच्या आजच्या शाळा बंद आंदोलनाला कास्ट्राईब संघटनेचा पाठिंबा

आज दिनांक 18 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्था मंडळाचे वतीने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शासन निर्णयाला विरोध करण्यासाठी आयोजित आज होणारे शाळा बंदला कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य च्यावतीने जाहीर पाठिंबा देण्यात आल्याची माहिती आकाश तांबे यांनी दिली

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 8 =