You are currently viewing महाविकास आघाडी सरकारमधील श्रेयवादाच्या लढाईत जनतेचा बळी….

महाविकास आघाडी सरकारमधील श्रेयवादाच्या लढाईत जनतेचा बळी….

– मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार

सावंतवाडी

महाविकास आघाडी सरकारमधील श्रेयवादाच्या लढाईत जनतेचा बळी दिला जात आहे. ही महाराष्ट्राच्या साडेअकरा कोटी जनतेची घोर फसवणूक आहे. त्यामुळे सरकारला ठिकाणावर आणण्यासाठी मनसेच्या आंदोलनात मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत नागरिकांनीही सहभागी व्हावे असे आवाहन मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी केले आहे.

कोरोना काळात अनेक व्यवसाय ठप्प होते. दुकाने, आस्थापना बंद होते.अनेक जणांची नोकरी गेली. तरुण बेरोजगार झाले.असे असताना महाविकास आघाडी सरकारने माहे एप्रिल पासून वीज दरात वाढ केली.याची जनतेला कल्पनाही नव्हती. दिवाळीपुर्वी वीजबिलात सवलत देणार असे ऊर्जा मंत्र्यांनी स्पष्ट केले होते. पण दिवाळी नंतर त्यांनी आपला शब्द फिरवत आलेले वीजबिल भरलेच पाहिजे अन्यथा वीज जोडणी तोडणार असल्याचे संगितले. अनेक लोकांना दुप्पट,तिप्पट वीजबिले आलेली आहेत. वीजवितरण कार्यालयात गेल्यानंतर तेथील अधिकारी अगोदर वीजबिल भरण्यास सांगतात. कोरोना परिस्थिति मुळे हतबल जनता सदर वीजबिल भरू शकत नाही व शक्यही नाही. म्हणूनच सामान्य जनतेला भेडसावणार्‍या या प्रश्नासंदर्भात माजी आमदार तथा राज्यसरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे उद्या सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे.हा मोर्चा मनसेचा नसून खर्‍या अर्थाने जनतेचा असून जिल्हावासीयांचा आवाज सरकार दरबारी पोचावा. यासाठी सावंतवाडी तालुक्यातील जनतेने उत्सपूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहनही सावंतवाडी मनसेतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 2 =