You are currently viewing निलेश राणे यांचं माझ्यावरील प्रेम हे अतूट नाते आहे – संजू परब

निलेश राणे यांचं माझ्यावरील प्रेम हे अतूट नाते आहे – संजू परब

सावंतवाडी :

सावंतवाडी माजी नगराध्यक्ष व भाजपा जिल्हा प्रवक्ते संजू परब यांचा वाढदिवस सावंतवाडी येथे आज मोठ्या जल्लोषात साजरा झाला. उपस्थित भाजप नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या शुभेच्छा नंतर आभार व्यक्त करताना संजू परब यांनी कार्यकर्त्यांचं हे प्रेम असंच अखंडित राहो असे आवाहन केले. माजी आमदार राजन तेली जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचेही त्यांनी विशेष आभार मानले. मनीष दळवी यांच्यामुळेच मी राजकारणात सक्रिय झालो. युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पद मनीष दळवी यांच्यामुळेच मला मिळालं. त्यानंतर नारायण राणे यांनी मला युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष व त्यानंतर सावंतवाडी तालुक्याचा अध्यक्ष केलं. त्यानंतर निलेश राणे माझ्या आयुष्यात आले व त्यांच्यामुळेच माझ्या एकंदरीतच आयुष्याला उभारी मिळाली.

निलेश राणे यांचं माझ्यावरील प्रेम हे अतूट नाते आहे. मागील १४ वर्षांच्या काळात त्यांनी माझा एकही वाढदिवस चुकविला नाही. ते मला भावासारखा मानतात आपल्या कुटुंबातील सदस्य मानतात हे माझं भाग्य आहे. खरंतर निलेश राणे मुळेच माझ्या जीवनाला उभारी मिळाली. त्यांच हे प्रेम असंच नेहमी माझ्या पाठीशी राहो, त्याला कुणाची दृष्ट लागू नये, अशा भावना माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी व्यक्त केल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा