You are currently viewing अवैध गांजा वाहतूक करताना रेडी येथील महिला वेंगुर्ले पोलीसांच्या जाळ्यात

अवैध गांजा वाहतूक करताना रेडी येथील महिला वेंगुर्ले पोलीसांच्या जाळ्यात

अवैध गांजा वाहतूक करताना रेडी येथील महिला वेंगुर्ले पोलीसांच्या जाळ्यात…

सापळा रचून कारवाई; २० हजारच्या गांजासह दुचाकी ताब्यात

वेंगुर्ले

दुचाकीवरून गांजाची वाहतूक करणाऱ्या रेडी येथील महिलेला वेंगुर्ले पोलीसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. ही कारवाई वेंगुर्ले-शिरोडा मार्गावर मोचेमाड पुला नजीक रात्री १०:०० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. वैशाली प्रकाश आसोलकर (३५) रा. सुकळभाटवाडी, असे संशयित महिलेचे नाव आहे. यावेळी तिच्याकडून २० हजार रुपये किमतीचा ६३६ ग्रॅम वजनाचा गांजा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली.
घटनेची अधिक माहिती अशी की, संबंधित महिला गांजा घेऊन विक्री करण्यासाठी वेंगुर्लेच्या दिशेने जात आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मोचेमाड पुला नजीक सापळा रचला होता. दरम्यान ती महिला पुला नजीक एम एच ०७ ए इ ०३३९ या दुचाकी वरून आली आणि अणसुर तीठ्या नजीक थांबली असता पोलिसांनी धाड टाकून तिची चौकशी सुरू केली. यावेळी तीची तपासणी केली असता तिच्या जवळ ६३६ ग्रॅम वजनाच्या एकूण अंदाजे २० हजार रुपये किमतीचा गांजा हा अमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवल्याचे दिसून आला. या प्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास म.स.पो.नि श्रीम. विद्या जाधव करीत आहेत.

*संवाद मिडिया*

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031

*Advt link*
https://sanwadmedia.com/104937/
————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + eighteen =