You are currently viewing कुडाळ अंजिवडे ते गारगोटी कोल्हापूर असा घाटमार्ग झाल्यास 45 कि.मी.ने अंतर कमी होइल….

कुडाळ अंजिवडे ते गारगोटी कोल्हापूर असा घाटमार्ग झाल्यास 45 कि.मी.ने अंतर कमी होइल….

कुडाळ अंजिवडे ते गारगोटी कोल्हापूर असा घाटमार्ग झाल्यास 45 कि.मी.ने अंतर कमी

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना राजू मसुरकर यांची निवेदना द्वारे मागणी

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील आंजिवडे गवळीवाडी भैरीची पांदन ते धुरीवाडी पाटगाव गारगोटी कोल्हापूर जिल्हा घाट मार्ग असा एकुण सुमारे 5.110 कि.मी. लांबीचा रस्ता झाल्यास सिंधुदुर्ग जिल्हा ते कोल्हापूर 45 कि.मी.ने अंतर कमी होणार असल्याने सदर रस्त्याचे बांधकाम स्टेट बजेट मध्ये समाविष्ट करुन सदर रस्त्यासाठी लागणारी खाजगी व वन जमीनीचे भूसंपादन करणे बाबतचे आदेश देण्याबाबत बाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना जिवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष
तथा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजू मसुरकर यांनी दिले आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील आंजिवडे गवळीवाडी भैरीची पांदन ते धुरीवाडी पाटगाव गारगोटी कोल्हापूर या मार्गाचे बांधकाम व रस्ता स्टेट बजेट मध्ये समाविष्ट केल्यानंतर हा घाट पूर्ण झाल्यास सुमारे 45 कि.मी. अंतर गोवा सावंतवाडी मार्गे कुडाळ तालुक्यातील आंजिवडे कोल्हापूर जिल्ह्यातील* *गारगोटी मार्गे कोल्हापूर व त्यामधील बांधकाम पुर्ण झाल्यास जनतेला कमी होईल. तसेच हा घाट मार्ग 5.110 कि.मी. असल्याने तो पूर्ण झाल्यास संपूर्ण कोल्हापूर व* *सिंधुदुर्गातील जनतेला सोयीस्कर होईल. व तसेच इंधन व वेळेची बचत होईल*.
*सदरील 5.110 कि.मी. चा* *ते पाटगाव कोल्हापूर घाट मार्गाचा सर्वे भूसंपादन लागणारी खाजगी जमीन, वनजमीन*, *त्याचप्रमाणे लागणारे मोऱ्या, छोटे पूल पाईप वगैरे रस्त्यांचे शासनामार्फत ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव सर्वे झाला असून यासाठी अंदाजे २५० कोटी रुपये या रस्त्याला खर्च लागणार असून याचा सर्वे शासनामार्फत झाला आहे तो खालीलप्रमाणे* –
*1) रस्ते नविन बांधकाम:-5.110 कि.मी*.
*2) लहान व मोठे पूल:-3 नग*.
*3) पाईप व मोऱ्या:- 28नग*.
*4) स्लॅब व कल्हवर्ट:- 28 नग*.
*5) संरक्षक भिंत:- 1710 मि*.
6) भूसंपादन:-
*1) खासगी जमीन:- 3.00 कि.मी*.
*2)वनजमीन:- 12.30 कि.मी*.
*सदर रस्त्याचे भूसंपादन करणे व रस्त्याचे नविन बांधकाम करणे. लहान पूल/ मोठे पूल/ संरक्षक भिंत/ मोऱ्या बांधणे ई. बाबी करणेसाठी अंदाजित २५० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे*.
*सद्यस्थीतीत सावंतवाडी आंबोली घाट मार्ग ते कोल्हापूर बेळगाव हा जाण्याचा मार्ग असल्याने या आंबोली घाटामध्ये बरेच वेळा पावसाळ्यात दरड कोसळून आंबोली घाट बरेचदा कित्येक दिवस बंद असतो. त्यामुळे अनेकदा गंभीर रुग्ण, त्याचप्रमाणे प्रवासी वाहतूक कोल्हापूर व बेळगाव होलसेल बाजारपेठ असल्याने सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांतील जनतेला खूप त्रास सहन करावा लागतो.त्यामुळे प्रस्तावित रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यास ४५ कि.मी.ने अंतर कमी होऊन या घाट मार्गाने प्रवास करुन वेळेची, इंधनाची व व्यापारदृष्टीने दोन्ही जिल्हृयातील जनतेला होणार आहे*.
*तसेच हा कुडाळ तालुक्यातील आंजिवडे घाट मार्ग पूर्ण झाल्यास अनेक पर्यटकांना आंजिवडे नजिक असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला मनोहर संतोषी गड व तसेच रांगणा तुळसुली गड त्याचप्रमाणे कुडाळ तालुक्यातील माणगाव मध्ये श्री गुरुदेव दत्त महाराजांचे अवतार घेतलेले जन्मस्थान टेंबे स्वामी यांचे जन्मस्थान या भागांमध्ये असून भाविक पर्यटकांना या तीनही धार्मीक पर्यटनाचा लाभ घेता येईल*.
*त्यामुळे या भागातील वर्दळ वाढून सर्व व्यापारी कुडाळ व सावंतवाडी तालुक्यातील व माणगाव खोऱ्यातील पर्यटकांमुळे बाजारपेठ मिळाल्याने याचा फायदा व्यापारी, रिक्षाचालक, टॅक्सीचालक, पर्यटकांना दाखवणारे गाईड, छोटे मोठे हॉटेल्स अशा विविध प्रकारच्या जनतेला रोजगार प्राप्त होईल तसेच सिंधुदुर्ग जिल्हृयातील आजारी व अपघात ग्रस्ताना सदर जवळच्या मार्गाने कोल्हापूर- पुणे येथे कमी वेळेत जाउुन उपचार घेता येईल. यामुळे या माझ्या विनंतीच्या अर्जाची दखल घेऊन आपण वरील प्रमाणे घाट मार्ग रस्ता(भूसंपादन सहित) पूर्ण करण्याकरिता स्टेट बजेट मध्ये समाविष्ट करावा अशी विनंती महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना जिवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष
तथा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजू मसुरकर यांनी केले आहे.

*राजेंद्र प्रभाकर मसुरकर*
*जिवनरक्षा वैद्यकीय* *प्रतिष्ठानचे अध्यक्ष* *तथा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस*.
*व्यापारी*
*ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
*संपर्क क्र :- 9422435760/ 8975857716*

 

*संवाद मिडिया*

*🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊*🏃‍♀️🏃‍♂️

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*खास स्वातंत्र्यदिनानिमित्त तब्बल *💫50% सूट..!!💫*

*_🏢सावंतवाडीचे प्रसिद्ध*

*👗किया फॅशन👘*

*कपड्याचे दालन घेऊन आले आहेत प्रत्येक खरेदीवर तब्बल 💫५० टक्के पर्यतची सूट..!!💫*

*_👼👧🧒लहान मुलांसह महिलांना 👩‍⚖️ लागणारे फॅन्सी कपडे 👘 २०० पासून अगदी २ हजारापर्यंत🤗_*

*_रेडीमेड ड्रेस 👘, लेगिन्स👖, प्लाझो👖, कुर्ती👘, कॉटन पॅन्ट👖, नाईटी 👘आणि बरेच काही…!!🤗_*

*_त्याचबरोबर नवजात बालकांपासून👶🏻 पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांचे 👦🏻कपडे उपलब्ध…!!🤗_*

*🎴आमचा पत्ता:-*
*दत्तात्रय निवास-गांधी चौक, सावंतवाडी, शॉप नंबर १५, तारा हॉटेल समोर*

*◾प्रोप्रा:-*
*सौ. निकीता नंदादिप चोडणकर*

*📲संपर्क:-*
*9403920802*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106270/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा