कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेची उद्या सभा
सावंतवाडी
कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेची उद्या बुधवार दि.११ जून रोजी सकाळी ११ वाजता जिमखाना मैदान येथे मालवणी गेस्ट हाऊस जवळ वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत मागील इतिवृत्ताचे वाचन, जमा खर्च वाचन, सन २०२५ ते २८ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारणी निवड ,आयत्या वेळेचे विषयावर चर्चा होणार आहे. या सभेला जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के व जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व सभासदांनी या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन सावंतवाडी शाखा अध्यक्ष ॲड.संतोष सावंत यांनी केले आहे.