You are currently viewing पारंपरिक मच्छिमारांच्या उपोषणास प्रशासनाचा प्रतिसाद नाही…

पारंपरिक मच्छिमारांच्या उपोषणास प्रशासनाचा प्रतिसाद नाही…

पारंपरिक मच्छिमारांच्या उपोषणास प्रशासनाचा प्रतिसाद नाही…

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली ; उद्यापासून मासेमारी, विक्री बंद ठेवण्याचे आवाहन…

मालवण

अनधिकृत पर्ससीन नौकांवर कारवाई सह अन्य मागण्यासंदर्भात पारंपरिक मच्छीमारांनी कालपासून येथील मत्स्यव्यवसाय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडले आहे. आजच्या दुसऱ्या दिवशी काही मच्छीमारांची प्रकृती खालावली. मात्र त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे.
दरम्यान प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने उद्या सकाळपासून सर्वांनी मासेमारी व मासे विक्री बंद ठेवून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्याचे आवाहन उपोषण कर्त्यांनी केले आहे.
जिल्ह्याच्या सागरी हद्दीत सुरू असलेल्या अनधिकृत पर्ससीन नौकांवर कारवाई करण्यात यावी यासह अन्य मागण्यासंदर्भात अखिल भारतीय मच्छीमार कृती समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांच्या नेतृत्वाखाली पारंपरिक मच्छीमारांनी काल सकाळपासून येथील मत्स्यव्यवसाय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार मच्छीमारांनी केला आहे. उपोषणाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी काही उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना सलाईन व गोळ्या देण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केल्या. मात्र हे उपचार घेण्यास मच्छीमारांनी नकार दिला.
उपोषणाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने उद्या सकाळपासून मच्छीमारांनी मासेमारी व मासे विक्री बंद ठेऊन प्रशासनाचा निषेध करावा असे आवाहन केले आहे. त्यामुळे अनधिकृत पर्ससीन नौकांविरोधात पारंपरिक मच्छीमारांनी पुकारलेले आंदोलन आता अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

*संवाद मीडिया*

🏮🪔🎊🏮🎉🏮🪔🏮
*खास दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स*🎁🧧

*☘️ पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक ह्युंदाई CNG कार्स सह..!!*

*ह्युंदाई CNG कार्स आता हजर स्टॉक मध्ये उपलब्ध*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙
https://sanwadmedia.com/114762/
💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114762/
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 − one =