You are currently viewing व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल महाविद्यालयात नवीन एम. फार्मसी अभ्यासक्रमास मान्यता

व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल महाविद्यालयात नवीन एम. फार्मसी अभ्यासक्रमास मान्यता

व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल महाविद्यालयात नवीन एम. फार्मसी अभ्यासक्रमास मान्यता

सावंतवाडी

व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोल, सावंतवाडी या महाविद्यालयात औषधनिर्माणशास्त्र पदविका (डी. फार्मसी) पदवी (बी. फार्मसी) बरोबरच आता २०२३ पासून औषधनिर्माणशास्त्रसाच्या पदव्युत्तर पदवी (एम. फार्मसी) च्या एकूण तीन शाखांच्या अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे.
महाविद्यालयात फार्मास्युटिकल केमिस्ट्री फार्मास्युटिकल क्वालिटी अशुरन्स फार्माकोलॉजी या तीन विषयांना फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य शासन यांची मान्यता तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे. रायगड यांची संलग्नता प्राप्त झाली आहे.

महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास आवश्यक असणारा अनुभवी प्राध्यापक वर्ग, तसेच संशोधनासाठी आवश्यक असणाऱ्या प्रयोगशाळा. उपकरणे. मशीन रूम, सेंट्रल इंस्ट्रुमेंटेशन रूम अद्ययावत करण्यात आलेली आहेत.
स्टेस्ट सीईटी सेलने पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रतेसाठी दिलेल्या नियमानुसार जी पॅट ची परीक्षा उत्तीर्ण होणारे तसेच खुल्या प्रवर्गातील ज्या विद्यार्थाना पदवी परीक्षेत किमान ५५% गुण व राखीव प्रवर्गातील विद्यार्थाना किमान ५०% गुण मिळाले आहेत असे विद्यार्थी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र असतील.
महाविद्यालयामध्ये नव्याने सुरु होणाऱ्या एम फार्मसी सारख्या अभ्यासक्रमामुळे जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील विद्यार्थाना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होत असून भविष्यात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर फार्मसीच्या क्षेत्रात शासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये उत्तम प्रकारच्या नोकारीच्या तसेच संशोधन कार्यात करिअर करण्याची संधी उपलब्ध होतील असे मनोगत संस्थेचे आधारस्तंभ व प्रेरणास्थान माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील व संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार डॉ. राहुल वेदप्रकाश पाटील यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा