You are currently viewing *रानकवी…..* *ना. धो. महानोर*

*रानकवी…..* *ना. धो. महानोर*

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

*रानकवी…..*
*ना. धो. महानोर*

या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतून चैतन्य गावे
कोणते पुण्य अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे…

या शेताने लळा लावला असा की
सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो
आता तर हा जीवच जसा जखडला
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो..

इथले रानोमाळ सघन घन पसरित हिरवी द्वाही
झुलत झुलत मस्तीत बुडाले गाणी आणिक मीही…

अशा तरल काव्यपंक्ती लिहिणारा, मातीशीच नातं जोडणारा, मातीत रमणारा हा रानकवी काळाच्या पडद्याआड गेला. काव्य रानातलं एक दाणेदार कणीस काळाने हळुवारपणे तोडून नेलं.

ना. धों. महानोर हे एका पिढीचे आयकॉन होते. हिंदीत जसे गुलजारांचे ग्लॅमर आहे तसे मराठी काव्य क्षेत्रात, मराठी साहित्य क्षेत्रात महानोरांचं ग्लॅमर आहे.

मराठीत निसर्ग कवितेचे तीन टप्पे आहेत. बालकवी, बोरकर आणि महानोर. बालकवींच्या कवितेत निखळ निसर्ग आहे. बोरकरांच्या कवितेत निसर्गासोबत माणूसही आहे आणि महानोर यांच्या कवितेत निसर्ग, माणूस आणि प्रत्यक्ष शेत जिथे शेतकरी राबतो —हे सारे आहेत. निसर्ग जरी तोच असला तरी त्यांचे पाहण्याचे दृष्टिकोन निरनिराळे आहेत.

त्यांची कविता काहीशी बोली भाषेतली बहिणाबाईंची परंपरा सांगणारी. त्यातला गोडवा, माधुर्य याला ग्रामीण स्पर्श आहे. त्यांच्या काव्यातला शब्द नि शब्द म्हणजे मातीतल्या बीजातून अवचित फुटलेला हिरवा अंकुरच जणू! त्यांनी कुठलीही आडा चौताल, निरर्थक गीते लिहिलीच नाहीत. छंदबद्ध आणि लय विभोर काव्ये रचली म्हणून ती जनमानसावर ठसली.

किती जिवाला राखायचं राखलं
तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं..

किंवा

राजसा जवळी जरा बसा
जीव हा पिसा तुम्हावीन बाई
कोणता करू शिणगार सांगा तरी काही..

चिंब पावसांनी रान झालंं
आबादानी
झाकू कशी पाठीवरली चांदण
गोंदणी..

अशा ठसकेबाज लावण्याही त्यांनी रचल्या. , ठेका, लय, भाव यांचा उगम त्यांच्या अस्सल शब्दांतूनच अवतरतो.

औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात, गरीब शेतकरी कुटुंबात महानोर जन्मले. अतिशय कष्टमय होते त्यांचे बालपण. पण जन्मत:च त्यांच्याकडे एक संवेदनशील मन होते. ते रानात रमले आणि तिथेच त्यांच्या प्रतिभेला कोंब फुटले. माती आणि कविता हाच जणू त्यांचा श्वास होता.

महानोरांना इतरांच्या, दुःखांची आणि महिलांच्या वेदनांची प्रचंड जाणीव होती. त्यांच्या आसपासच्या, खेड्यापाड्यातल्या बायांचं कष्टमय जीवन त्यांनी पाहिलं होतं आणि त्या वेदना त्यांच्या कवितेतून अनुभूतीने उमटल्या.

आबादानी, झिम्माड, बिल्लोरी, रूपखनी, पान्यामंदी झिंगल्या झाडांना बांधले पैंजण,येंगड, लंगर असे अनेक बोली भाषेतले शब्द जेव्हा त्यांच्या काव्यातून पाझरतात ते साऱ्या विश्वाचा गोडवा घेऊनच. त्यांची कविता त्यांची गाणी ओठावर रेंगाळतात ती या शब्दांमुळेच.

महानोरांनी राजकारण, चित्रपट सृष्टी आणि साहित्य विश्व या तीनही क्षेत्रात संचार केला. ते राजकारणात कलावंतांचे प्रतिनिधी होते. निवडणुकीच्या राजकारणात ते कधीच नव्हते. कुठल्याही पक्षाचे ते नव्हते. पण विधान परिषदेतील आमदार म्हणून त्यांनी वाङमयीन, सांस्कृतिक आणि कृषी क्षेत्रातले प्रश्न सभागृहात मांडले. कलावंतांच्या समस्या, अडचणी, नवोदित साहित्यिकांचे प्रश्न, चित्रपट क्षेत्रातल्या असुविधांचा सतत पाठपुरावा त्यांनी केला.

शेतकरी हा त्यांच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय. त्यांच्या अडचणी मांडताना, “पाणी आडवा पाणी जिरवा” सारख्या योजनांना शासनाची मदत मिळावी म्हणून ते धडपडत राहिले.
महानोर यांच्या कवितांमध्ये सौंदर्य जाणिवा तर होत्याच पण त्याचबरोबर निसर्गाशी एकरूप होण्यासाठीची अध्यात्मिक जाणीवही त्यांच्या कवितांमधून अनुभवायला मिळते. निसर्गाशी लळा लावणाऱ्या कविता त्यांनी नव्या पिढीला दिल्या.

माणसं जपणारा, माणसं जाणणारा, शब्दांची इमान ठेवणारा, शेत, माणूस, पक्षी —पाखरे ,झाडे, फळे, पाऊस— पाणी, दुष्काळ, पानझड या साऱ्यांशीच सतत जोडून राहिलेला हा एक लौकिक प्रतिभावंत कवी!
त्यांना श्रद्धांजली वाहताना, त्यांच्याविषयीची माझ्यापाशी असलेली वैयक्तिक आठवण मला विसरता येत नाही..

जळगावला असताना ते आमच्या घरा समोरच राहायचे. आपल्या प्रिय पत्नी बरोबर नित्यनेमाने सकाळी फिरायला जाताना ते भेटायचे.
एक अत्यंत साधा माणूस! शुभ्र सदरा लेंगा घालणारा. त्यांच्या वेशातून, त्यांच्या दिसण्यातून, वागण्यातून, बोलण्यातून कधीही त्यांच्यातला शेतकरी हरवलेला नसायचा.
रस्त्यात थांबून आवर्जून ते बोलायचे.
” काय ताई! लेखन कसं चाललंय? लिहीत राहा आणि समाजाला लेखनातून काहीतरी द्या..” असं अगदी मृदुपणे सांगायचे. कसलाही आव नाही, मी कुणीतरी श्रेष्ठ आहे असा भाव नाही, सोंग नाही. मूर्तीमंत साधेपणा हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख म्हणेन मी.माझ्या मुलींच्या लग्नसमारंभातही ते वडीलधारी व्यक्तीसारखे उपस्थित राहिले. नातेवाईकांच्या आग्रहास्तव त्यांनी त्यांच्या खास शैलीत त्यांच्या कविताही सादर केल्या. माझ्यासाठी या अविस्मरणीय आठवणी आहेत.

ना. धों. महानोर एक स्वच्छ, अस्सल गावरान माधुर्य जपणारं, महाराष्ट्राचं शानदार काव्यवैभवच जणू!

त्यांच्या कवितेची चाहती या नात्याने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते…

राधिका भांडारकर पुणे.

*संवाद मिडिया*

🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*

*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨‍🎓👩‍🎓

🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇

◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*

https://sanwadmedia.com/99360/
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷

◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*

*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*

*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰

*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*

🪪👩🏻‍🎓🧑🏻‍🎓
*स्कॉलरशिप*

*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*

*आताच भेट द्या –👇🏻*

*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*

*http://www.mitm.ac.in/*

*संपर्क -*📞
*02362-299195*

*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*

🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰

*FC Code-3440*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99360/
———————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 4 =