You are currently viewing बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी शेतात जाऊन घेतला भात लागवडीचा अनुभव

बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी शेतात जाऊन घेतला भात लागवडीचा अनुभव

*बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी शेतात जाऊन घेतला भात लागवडीचा अनुभव*

बांदा

 *बिन भिंतीची उघडी शाळा,*
*लाखो इथले गुरु,*
*झाडे ,वेली, पक्षी, पाखरे*
*यांशी गोष्टी करू*
असे महाकवी ग. दि. माडगूळकर यांनी म्हटलेले आहे. याच निसर्गाच्या सानिध्यात जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्रशाळेच्या स्काऊट गाईड पथकातील विद्यार्थ्यांच्यासाठी एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत बांधावरची शाळा भरवून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भात रोप लागवडीचा मनमुराद आनंद लुटला.
कृषी प्रधान असलेल्या भारत देशात शेतीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे .जवळपास ७० टक्के लोक शेती व्यवसाय करत असतात. शालेय वयातच विद्यार्थ्यांमध्ये शेतीची आवड निर्माण व्हावी म्हणून या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली होती .बांधावरच्या या शाळेत विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनी देखील प्रत्यक्ष शेतात उतरून चिखलात काम करण्याचा अनुभव घेतला .
चाकोरीबद्ध शिक्षणाच्या बाहेर जाऊन विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठीच्या या उपक्रमामुळे निश्चितच मदत झाली होणार आहे विद्यार्थ्यांच्या मनात बळीराजाबद्दल आदर निर्माण व्हावा, श्रमप्रतिष्ठामध्ये वाढ व्हावी ,शेतीच्या व आधुनिक व पारंपारिक साधनांची तसेच खते, कीटकनाशके ओळख करून देण्यात आली.
मुख्याध्यापक उर्मिला मोर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या या उपक्रमात शाळेचे स्काऊटर शिक्षक श्री जे.डी.पाटील, पदवीधर शिक्षिका स्नेहा घाडी याचबरोबर मनिषा मोरे सपना गायकवाड आदि शिक्षक सहभागी झाले होते‌.शाळेने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − eight =