You are currently viewing हळवल गावासाठी स्वतंत्र वायरमन मिळणेबाबत ग्रामस्थांतर्फे महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर 

हळवल गावासाठी स्वतंत्र वायरमन मिळणेबाबत ग्रामस्थांतर्फे महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर 

कणकवली

हळवल गावात वारंवार वीज समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे हळवल गावासाठी स्वतंत्र वायरमन द्यावा अशी मागणी हळवल ग्रामस्थांनी आज केली. याबाबत चे निवेदन कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांना दिले.

या निवेदनात असे म्हटले आहे की, हळवल गावामध्ये सद्यस्थितीत स्वतंत्र वायरमन नाही. पावसाळ्याचे दिवस असल्याने हळवल गावातील ग्रामस्थांना लाईट जाणे व विद्युत पुरवठा खंडित होणे तसेच विद्युत लाईनवर आलेली झाडे तोडली नसल्यामुळे ती वादळाच्या वेळी पुन्हा पुन्हा लाईटच्या लाईनवर पडत असल्याने वीज पुरवठा खंडीत होतो. सदरची समस्या तात्काळ दूर करावे. गावासाठी नवीन स्वतंत्र वायरमन देण्यात यावा.

यावेळी उपसरपंच सान्वी गावडे, माजी उपसरपंच प्रदीप गावडे, माजी सरपंच संतोष गुरव, ग्रामपंचायत सदस्य सचिन ठाकूर, भरत गावडे, लवू परब, शिवा राणे, सुदर्शन राणे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा