बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप…

बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप…

सिंधुदुर्गनगरी 

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांना सुरक्षा संच किटचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती सरकारी कामगार अधिकारी यांनी दिली.

       कुडाळ तालुक्यातील बांधकाम कामगारांना शनिवार दि. 21 नोव्हेंबर रोजी वासुदेवानंद हॉल, कुडाळ येथे सुरक्षा संच किट वाटप करण्यात येणार आहे.  तरी कुडाळ तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी याचा लाभ घ्यावा. तसेच इतर तालुक्यातील बांधकाम कामगारांचे सुरक्षा संच किट वाटपाचा कार्यक्रम लवकरच जाहिर करण्यात येणार आहे, असे आवाहन कामगार कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा