You are currently viewing २९ जुलै रोजी मुंबईत ‘सा रे ग म प २०२३’साठी ऑडिशन्स होणार*

२९ जुलै रोजी मुंबईत ‘सा रे ग म प २०२३’साठी ऑडिशन्स होणार*

*२९ जुलै रोजी मुंबईत ‘सा रे ग म प २०२३’साठी ऑडिशन्स होणार*

*इतिहासात प्रथमच ‘सिंगर ऑफ द वीक’ला मिळणार ‘झी म्युझिक कंपनी’तर्फे त्याचे मूळ गीत प्रसृत करण्याची संधी*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गेल्या तीन दशकांत ‘झी टीव्ही’ वाहिनीने प्रेक्षकांसाठी अंताक्षरी, सा रे ग म प, डान्स इंडिया डान्स आणि इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ यासारखे वास्तववादी कार्यक्रम सादर केले. अंगच्या कलागुणांवर आधारित असलेले हे रिअॅलिटी कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये विलक्षण लोकप्रिय तर झालेच, पण ते आजही तितकेच लोकप्रिय असून आजच्या काळातही त्यांना स्वत:चा प्रेक्षकवर्ग आहे. गतवर्षीच्या सा रे ग म प लिटल चॅम्प्सच्या उदंड यशानंतर ‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प’ हा आयकॉनिक कार्यक्रम देशातील होतकरू गायकांना जनतेसमोर आपल्या गायनकलेचे प्रदर्शन करण्याची आणि पार्श्वगायनाच्या क्षेत्रात आपली कारकीर्द उभी करण्याची संधी देण्यासाठी लवकरच सुरू होणार आहे.

‘सा रे ग म प २०२३’साठी शनिवार, २९ जुलै रोजी मुंबई शहरात प्रत्यक्ष ऑडिशन्सना सकाळी ८ वाजल्यापासून नहार इंटरनॅशनल स्कूल, नहारचा अमृत शक्ती रोड, डीपी रोड नं. २, चांदिवली, पवई, मुंबई- ४०००७२ येथे प्रारंभ होणार आहे. जर तुम्ही १५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे असाल, तर तुम्हाला ही संधी उपलब्ध आहे. या कार्यक्रमासाठी ऑनलाइन ऑडिशन्स यापूर्वीच सुरू झाल्या असून त्यासाठी तुम्हाला केवळ झी५ हे अॅप मोबाईलमध्ये उतरवून घ्यावे लागेल. त्यावरील योग्य त्या गटात प्रवेश करून तुम्ही आपली प्रवेशिका पाठवू शकता.

होतकरू गायकांसाठी आणखी एक उत्साहजनक बातमी म्हणजे, गायनविषयक रिअॅलिटी कार्यक्रमांच्या इतिहासात प्रथमच ‘झी टीव्ही’ वाहिनीने ह्या पर्वासाठी प्रेक्षकांना इच्छुक स्पर्धकांची निवड करण्यासाठी निमंत्रित केले आहे. “आखिर टॅलेंट को पेहचानना भी एक टॅलेंट है!” प्रेक्षकांना एखाद्या गुणी गायकाचा शोध घेण्याची संधी देऊन या वाहिनीने देशातील अशा होतकरू गायकांचा शोध घेण्याचा आणि सा रे ग म प कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी करून घेण्याची शिफारस करण्याचा अधिकार दिला आहे. तसेच कार्यक्रमाच्या ह्या पर्वात अपवादात्मक स्पर्धकांसाठी ‘सिंगर ऑफ द वीक’ म्हणून निवड झालेल्या गायकाला त्याचे गाणे झी म्युझिक कंपनीद्वारे प्रसृत करण्याची संधी मिळणार आहे. इतकेच नव्हे, तर वाहिनी एका महत्त्वपूर्ण उपक्रमास प्रारंभ करीत असून त्यानुसार या कार्यक्रमात प्रथमच कागदाचा वापर कुठेही होणार नाही. यंदाच्या ऑडिशन्समध्ये आणि नंतर प्रत्यक्ष कार्यक्रमातही कागदाचा वापर अजिबात केला जाणार नाही. हे एक पर्यावरणप्रेमी, जबाबदार, प्रथमच योजलेले वैशिष्ट्यपूर्ण पाऊल असून रिअॅलिटी टीव्ही कार्यक्रमाच्या इतिहासात असे प्रथमच घडत आहे.

येत्या काही आठवड्यांमध्ये गुवाहाटी, कोलकाता, बंगळुरू, लखनौ, चंदिगड, जयपूर, दिल्ली आणि वडोदरा या शहरांमध्ये ऑडिशन्सना प्रारंभ होणार असून झी टीव्ही मुंबई शहरातही प्रत्यक्ष स्थळांवर ऑडिशन्स घेणार आहे. तेव्हा तुम्हाला जर असे वाटत असेल की तुमचा आवाज सुरेल आहे आणि तो जगापुढे सादर केला पाहिजे, तर तुम्हाला नजीकच्या शहरात जाऊन ऑडिशन्समध्ये सहभागी व्हावे लागेल.

 

*संवाद मिडिया*

🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*

*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨‍🎓👩‍🎓

🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇

◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*

https://sanwadmedia.com/99360/
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷

◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*

*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*

*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰

*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*

🪪👩🏻‍🎓🧑🏻‍🎓
*स्कॉलरशिप*

*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*

*आताच भेट द्या –👇🏻*

*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*

*http://www.mitm.ac.in/*

*संपर्क -*📞
*02362-299195*

*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*

🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰

*FC Code-3440*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99360/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − ten =