You are currently viewing तालुक्यातील ११ ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना व भाजपा एकमेकांसमोर

तालुक्यातील ११ ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना व भाजपा एकमेकांसमोर

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील ११ ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना व भाजपा एकमेकांसमोर लढत देणार आहे. आजच्या उमेदवारी अर्ज छाननीत एकमेव अर्ज अवैध ठरला आहे. तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या ११९ सदस्यासाठी दाखल केलेल्या ३८४ अर्जावर आज छाननी प्रक्रिया झाली यामध्ये तळवडे ग्रामपंचायतीसाठी दाखल अर्जापैकी एक अर्ज अपुऱ्या कागदपत्रामुळे अवैध ठरविण्यात आला तर इतर अर्जावर कोणाची हरकत नसल्याने ३८३ अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी वैध घोषित केले.

तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतीच्या ११९ सदस्यांसाठी निवडणुका दि.१५ जानेवारी रोजी होऊ घातले आहेत यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर होती अकरा ग्रामपंचायतीसाठी असलेल्या ११९ सदस्यासाठी तब्बल ३८४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची झालेली गर्दी लक्षात घेता निवडणूक निर्णय अधिकारी श्री म्हात्रे यांनी विहित कालावधी वाढवून देत उमेदवारी अर्ज स्वीकारले होते.

आज प्राप्त अर्जावर छाननी प्रक्रिया पार पडली यावेळी प्रत्येक ग्रामपंचायत निहाय प्रक्रिया पार पाडताना सर्व पॅनलच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते यावेळी कोणीही दाखल केलेल्या अर्जावर हरकत घेतली नाही मात्र छाननीत तळवडे ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या भुषण मंगेश परब यांची आवश्यक कागदपत्रे अपुरी असल्याने त्याचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. बाकीचे ३८३ उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले. ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया होणार असून यामध्ये कोण कोण उमेदवारी अर्ज मागे घेतो आणि कोण रिंगणात राहतो हे चित्र स्पष्ट होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × five =