You are currently viewing वेंगुर्लेतील रोहित स्पोर्ट्स क्रिकेट क्लबचे मालक रोहित बोवलेकर यांचे दुःखद निधन

वेंगुर्लेतील रोहित स्पोर्ट्स क्रिकेट क्लबचे मालक रोहित बोवलेकर यांचे दुःखद निधन

वेंगुर्ले :

 

वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथील रहिवासी रोहित स्पोर्ट्स क्रिकेट क्लबचे मालक तसेच बोवलेकर कॅशुचे संचालक रोहित बोवलेकर यांचे आज २५ जुलै रोजी सायंकाळी निधन झाले.

रोहित यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला धक्का बसला असून हळहळ व्यक्त होत आहे. रोहित यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, दोन भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे. बोवलेकर कॅशुचे मालक सुरेश बोवलेकर यांचे ते पुत्र होत. रोहित बोवलेकर यांना क्रिकेट ची प्रचंड आवड होती. त्यांच्या मालकीचा रोहित स्पोर्ट संघाने लाखोंची बक्षिसे असणाऱ्या अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेनिस क्रिकेट मध्ये रोहित स्पोर्ट्स हा संघ अग्रस्थानी आहे. त्यांच्या या जाण्याने टेनिस क्रिकेटच्या सर्व खेळाडूंना धक्का बसला असून टेनिस क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा