You are currently viewing देवगड जामसंडेचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करा : आ. नितेश राणे

देवगड जामसंडेचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करा : आ. नितेश राणे

देवगड

देवगड जामसंडे नगरपंचायत पाणीपुरवठा करणाऱ्या दहीबाव अन्नपूर्णा प्रादेशिक नळ योजना दुरुस्तीचा प्रस्ताव तातडीने द्यावा. देवगड जामसंडे भागातील पाणीपुरवठा सहा दिवस बंद आहे तो तातडीने सुरू होण्यासाठी अनुषंगिक असलेले सर्व उपाययोजना तात्काळ करण्याचे आदेश आमदार नितेश राणे यांनी देवगड जामसंडे नगरपंचायत प्रशासनाला दिले आहे.

देवगड जामसंडे शहराच्या बंद असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात तातडीची बैठक आमदार नितेश राणे यांनी नगरपंचायत सभागृहात आयोजित केली होती. या बैठकीला नगराध्यक्षा साक्षी प्रभू,उपनगराध्यक्षा मितालीसावंत, बाळा खडपे, मजिप राजेंद्र मेस्त्री,प्रकासकीय अधिकारी ,सर्व नगरसेवक नगरसेविका आदी उपस्थित होते.

या बैठकीत आमदार नितेश राणे यांनी पाणी पुरवठा सहा दिवस बंद का आहे. याबाबतचा सविस्तर आढावा घेतला, गेले २३ दिवस शिरगाव पाडाघर योजतुन न होऊ शकलेला पाणीपुरवठा, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा,सतत गळती होत असलेली नादुरुस्त पाईपलाइन ही समस्या कायम उदभवत आहे . हे या बैठकीत उघड झाले .

शिरगाव पाडघर रस्ताचे काम करणाऱ्या ठेकेदाराने नलयोजनेची पाईपलाईन फोडून टाकल्याने टेंबवलीच्या पुढे एअर आल्याने पाणी येत नसल्याची माहिती ठेकेदार बिपिन कोरगावकर यानी सभागृहात दिली. हा बिघाड दोन दिवसात काढून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश आमदार नितेश राणे यांनी दिले.यावेळी ठेकेदार बिपीन कोरगावकर यांनी डिसेंबर 2022 मध्ये आपला कामाचा ठेका संपला असून त्याला पुढील वाढ दिलेली नाही.यावर आमदार राणे यांनी जि प मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांना याबाबत कल्पना दिली व सोमवारी संबंधित ठेकेदार यांचेबरोबर बैठक लावावी.अशी सूचना केली.

दहीबाव तळेबाजार लाईन योजनेसाठी सिंगल फिडर लाईन टाकण्यात यावी. अशी मागणी नगरसेवक बुवा तारी यांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे केली तसेच या योजनेच्या सर्व दुरुस्ती करण्यासाठी चार कोटोची तरतूद करावी अशी मागणी करण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव पुढील दोन दिवसा मंत्रालय पातळीवर पाठवावा.अशी सूचना आमदार नितेश राणे यांनी नगरपंचायत प्रशासनाला केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − seven =