You are currently viewing आला पाऊस पाऊस

आला पाऊस पाऊस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री पुष्पा सदाकाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

*आला पाऊस पाऊस*

*आला पाऊस साजन*
*केलं त्यांने नाच काम*
*वाटे रांगडा खट्याळ*
*तरी आवडी घनश्याम*

*किती उशीर रे झाला*
*मास आषाढाचा आला*
*ढिगुजी मिगुजी म्हणून*
*पुकारा तुझाच झाला*

*बेधुंद तू कोसळला*
*बाळगोपाळांसवे नाचला*
*नको फिरवू पाठ आता*
*जीव तुझ्यासाठी आटला*

*खळाळती ओढे नाले*
*सुखावली धरणी माता*
*भेगाळलेल्या भुईची*
*टिकवावी ओल आता*

*येरे तू पावसा पावसा*
*भरोसा तुझ्यावरच सारा*
*विजेच्या तांडव नृत्यात*
*कर मोतीथेंबांचा भंडारा*

*तुझ्या आषाढ मेघांना*
*दवबिंदूंची शोभते झूल*
*दृष्ट काढता म्हणते रे*
*नको होऊ पुन्हा गूल*

*अस्सा पाऊस पाऊस*
*जणू उरूस धरणीचा*
*इंद्रधनुच्या सप्तरंगात*
*फुले पिसारा मोरनीचा*…

*काव्यपुष्प*..✍️
*पुष्पा सदाकाळ पुणे*..
*90 11 65 97 47*

 

*संवाद मीडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

संपर्क:
*9145623747 / 9420156771 / 7887561247*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/101911/
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 3 =