You are currently viewing सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात भरती

सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात भरती

सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात भरती

 – शिक्षणाधिकारी महेश धोत्रे

सिंधुदुर्गनगरी

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यांनी दिली आहे.

            सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व स्थानिक स्वराज्य व अनुदानित शाळा ह्या १५ जून रोजी सुरु झालेल्या असून जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची पदे ही आंतरजिल्हा बदलीमुळे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी, तसेच नियोजित शिक्षक भरती संदर्भात उच्च न्यायालयात दाखल रिट याचिकांमुळे भरती प्रक्रीयेस विलंब होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.

                या सर्व परिस्थिती विचारात घेऊन पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा परिषद शाळांतील रिक्त शिक्षकीय पदे पुढील अटी शर्तीला अनुसरुन भरण्यात येणार आहेत.

            सदर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा ७० वर्ष असेल, मानधन रुपये २० हजार प्रतीमाह (कोणत्याही इतर लाभाव्यतिरीक्त), जिल्हा परिषदेच्यावतीने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याशी करारनामा करावा लागेल, बंधपत्र / हमीपत्र नियुक्तीच्या कालावधीत करार पध्दतीने शिक्षकीय पदाचे विहीत काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील, या आशयाचे बंधपत्र / हमीपत्र संबंधित उमेदवारांना द्यावयाचे आहे. या बंधपत्र/हमीपत्रामध्ये करार पध्दतीने नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती, विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा करार करुन घेण्यात येणार आहे. तसेच सदर हमी पत्रामध्ये नियुक्ती करण्यात आलेल्या व्यक्तीकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही असे नमूद असेल, सिंधुदुर्ग जिह्यातील जिल्हा परिषद शाळेतील रिक्त असणाऱ्या शिक्षक पदाची गरज लक्षात घेवून नियुक्ती देण्यात येणार आहे, नियुक्त करण्यात आलेला शिक्षक हा नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंतच असेल,  नियुक्त्या 15 दिवसांत करण्यात येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया आयुक्त (शिक्षण) यांच्या नियंत्रणाखाली पूर्ण करण्यात येणार आहे. याबाबतचे अर्ज गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती यांचेमार्फत दिनांक 14 जुलै २०२३ रोजी पर्यंत सायं. 5 वा. पर्यंत सादर करावेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − eighteen =