You are currently viewing ” मोदी @ 9 ” अभियानाचे लोकसभा संयोजक केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेबांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा अहवाल सादर

” मोदी @ 9 ” अभियानाचे लोकसभा संयोजक केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेबांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा अहवाल सादर

*” मोदी @ 9 ” अभियानाचे लोकसभा संयोजक केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेबांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा अहवाल सादर*

” मोदी @ 9 ” अभियान अंतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ३० मे ते ७ जुन या कालावधीत विशेष जनसंपर्क अभियान आणि विविध कार्यक्रम आयोजित केले , या कार्यक्रमाचा अहवाल सावंतवाडी विधानसभा संयोजक व जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकसभा मतदारसंघाचे संयोजक केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेबांना लिखित स्वरूपात सुपूर्द केला .
३० मे २०२३ रोजी पंतप्रधान मान. नरेंद्रभाई मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ९ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान.जे.पी.नड्डा यांच्या नेतृत्वाखाली देशभर लोकसभा मतदारसंघात ” विशेष जनसंपर्क अभियान ” राबविण्यात आले .तसेच जिल्हा , मंडल , शक्तीकेंद्र आणि बुथ पातळीवर वेगवेगळे कार्यक्रम दिले होते .
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली वेंगुर्ले , सावंतवाडी , आंबोली , बांदा , दोडामार्ग या मंडलात पत्रकार परिषद , टिफीन बैठक , विकास तीर्थ , जेष्ठ कार्यकर्ता संमेलन , संयुक्त मोर्चा संमेलन , लाभार्थी संमेलन , योग दिन , व्यापारी संमेलन , बुद्धीवंत संमेलन , संपर्क से समर्थन , सोशल मिडीयावरील प्रभावशाली व्यक्तींशी संवाद , मन की बात , सरपंच व उपसरपंच बैठक , अनुसूचित जाती मोर्चा बैठक , घर घर संपर्क अशा कार्यक्रमातून मोदी सरकारच्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांची माहीती सामान्य जनतेपर्यंत पोहचवली , तसेच ९०९०९०२०२४ हा नंबर प्रत्येकाकडून डाईल करुन मोदीजींना समर्थन दिले .तसेच विधानसभा मतदारसंघातील २५० प्रभावशाली कुटुंबांची यादी करुन २५ प्रमुख पदाधिकाऱ्यांना प्रत्येकी १० कुटुंब संपर्कासाठी विभागुन दिली . यामध्ये समाज घटकातील प्रभावशाली व्यक्तिमत्व , खेळाडु , कलाकार , उद्योजक , हुतात्मा सैनिक , वारकरी तसेच अन्य कुटुंबांशी संपर्क करून मोदी सरकारच्या कार्याचे पत्रक दिले . अशा प्रकारे मोदी सरकारचे कार्य समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी प्रामाणिक प्रयत्न केले व त्यांनी केलेल्या कार्यक्रमाचा अहवाल केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेबांना सुपूर्द केला .
यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , जिल्हा प्रवक्ते संजु परब , जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी – प्रमोद कामत – सोमनाथ टोमके , जि.प.उपाध्यक्ष राजन म्हापसेकर , वेंगुर्ले अध्यक्ष सुहास गवंडळकर , आंबोली अध्यक्ष रविंद्र मडगांवकर , दोडामार्ग अध्यक्ष सुधीर दळवी , सावंतवाडी अध्यक्ष अजय गोंदांवळे , बांदा अध्यक्ष महेश धुरी , सावंतवाडी महीला अध्यक्षा मोहीनी मडगांवकर , सावंतवाडी सरचिटणीस परिक्षीत मांजरेकर व विनोद सावंत , नगरसेवक आनंद नेवगी इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते .

 

*संवाद मिडिया*

*🎊खास ऑफर…!! 🎊खास ऑफर…!! 🎊खास ऑफर…!!🎊*

_🏢सावंतवाडीच्या *✡️टायझर आणि कॉटनकिंग✡️* मध्ये *💫खास ऑफर…!!💫*_

_🎊नव्या व आलिशान दालनाच्या ओपनिंग निमित्त असंख्य ग्राहकांसाठी एक-दोन नव्हे तर २० ते २५ टक्क्यापर्यंतची भरघोस सूट…!!🎊_

*🔸कॉटनकिंग वर 20%*
*🔹टायझरवर 25%*

*_📌ही ऑफर फक्त ९ जुलै पर्यत…_*

*🎴आमचा पत्ता:-*
_साईप्रसाद कलेक्शन_
रामेश्वर प्लाझा, मोती तलावाजवळ, सावंतवाडी

*☎️संपर्क:-*
9881234047

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/101891/
_________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा