You are currently viewing भुईबावडा गावातील भाजप कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

भुईबावडा गावातील भाजप कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले त्यांचे शिवसेनेत स्वागत

वैभववाडी –

भुईबावडा गावातील भुईबावडा बाजारपेठेतील भाजपा कार्यकर्त्यांनी जिल्हा बँक अध्यक्ष श्री. सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यामध्ये प्रशांत नारकर, शीतल भुर्के, प्रल्हाद कांबळे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे माजी सभापती दीपक पांचाळ, उपतालुका संघटक बाबा मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला
या वेळी प्रवेश केलेल्या प्रशांत नारकर,शीतल भुर्के, प्रल्हाद कांबळे यांना भुईबावडा ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी देणात आली.
यावेळी शिवसेना नेते संदेश पटेल, युवासेना जिल्हा चिटणीस – स्वप्नील धुरी, चित्रपट निर्माते- दीपक कदम , उपतालुका प्रमुख- सुरेश पांचाळ, उपतालुका संघटक – बाबा मोरे, माजी सभापती – दिपक पांचाळ , जनार्धन विचारे, डॉ. जाधव, रमेश नारकर, श्री. सुर्वे, अनिल गांधी, मनोहर मोरे, प्रमोद मोरे, पाथरे,गुरव आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + eighteen =