You are currently viewing संजय गांधी निराधार योजना समिती सभेत ४९ प्रस्तावांना मंजुरी

संजय गांधी निराधार योजना समिती सभेत ४९ प्रस्तावांना मंजुरी

देवगड :

 

देवगड तालुका संजय गांधी निराधार योजना समिती सभेत एकूण ४९ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. ही सभा समितीचे अध्यक्ष तथा शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

या सभेस तहसीलदार मारुती कांबळे, सदस्या हर्षा ठाकूर, सज्जाउद्दीन सोलकर, संजय देवरुखकर, विश्वनाथ परब, अव्वल कारकून एम. व्ही. रुमडे, जांभेकर, प्राजक्ता चिंदरकर, उपस्थित होत्या.

या सभेत विधवा निराधार १८, अविवाहित २, दिव्यांग ११, वृद्धापकाळ २ व श्रावणबाळ १६ अशा एकूण ४९ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यावेळी अन्य प्रस्तावांवर सुद्धा चर्चा करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा