You are currently viewing जिल्हा परिषदेतर्फे दुर्धर आजारग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत…

जिल्हा परिषदेतर्फे दुर्धर आजारग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत…

११० दुर्धर आजारी रुग्णांना करण्यात आली मदत

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या दुर्धर आजारी रुग्णांना आर्थिक मदत योजनेअंतर्गत आतापर्यंत ११० दुर्धर आजारी रुग्णांना लाभ देण्यात आला आहे. यासाठी १२ लाख ४० हजार रुपये निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती आरोग्य समिती सभेत देण्यात आली. जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा सभापती सावी लोके यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे ,समिती सदस्य लॉरेन्स मान्येकर ,प्रितेश राऊळ , हरी खोबरेकर, नूतन आईर, आदींसह खातेप्रमुख ,अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील दुर्धर आजार रुग्णांना औषध उपचारासाठी मदत व्हावी. यासाठी जिल्हा परिषदेमार्फत दुर्धर आजारी रुग्णांना आर्थिक मदत ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी २५ लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून आतापर्यंत ११० दुर्धर आजारी लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. यासाठी १२ लाख ४० हजार एवढा निधी वितरित करण्यात आला आहे .तरी अद्यापही २५ लाभार्थींचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यांना लवकरच लाभ दिला जाईल. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलीपे यांनी सभेत दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − five =