You are currently viewing आजी माजी ४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची दिंडी पाहून प्रभादेवी थबकली

आजी माजी ४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची दिंडी पाहून प्रभादेवी थबकली

*बालविकास मंदिर मराठी माध्यमिक शाळा प्रभादेवी यांचा सातत्यपूर्ण उपक्रम*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

 

आषाढी एकादशी निमित्त बालविकास मंदिर मराठी माध्यमिक शाळा प्रभादेवी यांनी दिंडीचे आयोजन केले. या दिंडीत मुख्याध्यापक नरेंद्र शिर्के, सर्व शिक्षक तसेच प्राथमिक व माध्यमिकचे जवळपास दोनशे पन्नास विदयार्थी व शंभरहून अधिक माजी विद्यार्थी सहभागी झाले. शाळेतून पालखी घेऊन बाणेश्वर वरळी बस डेपो येथे असलेल्या विठ्ठल मंदिरापर्यंत विठ्ठल नामाचा जयघोष करत दिंडी नेण्यात आली. पारंपरिक वाद्य वाजवणारे आणि लेझीमच्या तालावर नाचणारे विद्यार्थी यामुळे पालखीला उत्सवाचे स्वरूप आले. विद्यार्थ्यांना सांस्कृतिक वारसा व वारीचे महत्व कळावे यासाठी ही शाळा दरवर्षी असा प्रयत्न करते. आज मराठी शाळांचे अस्तित्व कमी होत असताना या शाळेने केलेला हा प्रयत्न खरोखरच वाखाण्याजोगे आहे.

आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचे आयोजन बालविकास मंदिर मराठी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. मुख्याध्यापकांच्या हस्ते पालखी पूजन करून सोहळ्यास सुरुवात झाली. बाणेश्वर वरळी बस डेपो येथे असलेल्या विठ्ठल मंदिरापर्यंत विठ्ठल नामाचा जयघोष करत दिंडी नेण्यात आली. विठ्ठलाचे दर्शन घेऊन भक्तीगीत व अभंग विद्यार्थ्यांनी सादर केले. संतवाणी व अभंग ऐकण्यासाठी प्रभादेवीतील नागरिकांनी दुतर्फा गर्दी केली होती. मुख्याध्यापक तसेच शिक्षक – शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थांनी केलेल्या टाळ मृदंगाच्या तालावर विठ्ठल नामस्मरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थांच्या दिंडीमुळे संस्कृती व संस्कार पुढच्या पिढीकडे पोहचवण्यात शाळेला यश मिळत असल्याबद्दल उपस्थितांसह परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − eleven =