You are currently viewing भाजपा वेंगुर्ले च्या वतीने आणिबाणी दिवसाची आठवण म्हणून निषेधाचे काळे झेंडे फडकावले

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने आणिबाणी दिवसाची आठवण म्हणून निषेधाचे काळे झेंडे फडकावले

*भाजपा वेंगुर्ले च्या वतीने आणिबाणी दिवसाची आठवण म्हणून निषेधाचे काळे झेंडे फडकावले*

इंदिरा गांधी यांनी २५ जुन १९७५ ला देशावर लादलेल्या आणिबाणीला ४८ वर्षे पूर्ण होत आहेत . ज्या सत्तेसाठी इंदिरा गांधी यांनी आणिबाणी लादुन लोकशाहीचा गळा घोटला त्याचा निषेध करण्यासाठी भाजपा वेंगुर्ले च्या वतीने काळे झेंडे फडकावले .
इंदिरा गांधींनी आपल्या सत्तेला हादरा बसण्याच्या भयगंडाने पछाडुन आणिबाणी लादली . १९७१ मध्ये प्रचंड बहुमताने सत्तेत आलेल्या इंदराजींना महागाई , बेरोजगारी यासारखे प्रश्न हाताळता न आल्याने त्यांच्या विरुद्धचा असंतोष वाढु लागला होता . व याविरुद्ध देशात अनेक ठिकाणी आंदोलने होऊ लागली होती . याच पार्श्वभूमीवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधी यांची लोकसभेवरील निवड रद्द ठरविण्याचा निर्णय दिला.या निर्णयाने आपले राजकीय भवितव्य असुरक्षित वाटू लागल्यानेच इंदिरा गांधींनी आणिबाणी सारखे घातकी पाऊल उचलले . त्या काळ्याकुट्ट पर्वाला ४८ वर्षे पूर्ण झाली . त्याचा निषेध म्हणून भाजपा च्या वतीने काळे झेंडे फडकावले .
यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली , प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण , वैद्यकीय आघाडी चे डॉ.अमेय देसाई , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक – बाळा सावंत – वसंत तांडेल , ता.सरचिटनिस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर , अटल प्रतिष्ठान चे नकुल पार्सेकर , दादा केळुसकर , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस , ता.चिटणीस समीर कुडाळकर व नितीन चव्हाण , विजय नाईक , सरपंच प्रणाली खानोलकर , उपसरपंच सुभाष खानोलकर , सुनील घाग , वसंत परब , शक्ती केंद्र प्रमुख सुधीर गावडे व शामसुंदर मुननकर , रविंद्र शिरसाठ , सुर्यकांत परब , आनंद परब , तात्या केळजी , ओंकार चव्हाण , सुनील सावंत , अजित राऊळ सर , भाऊ बागायतकर , बाबा राऊत , शिरगांवकर , प्रथमेश सावंत तसेच इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा