You are currently viewing सावंतवाडी पोलिसांनी बावळाट येथे गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी आजरा येथील पिता – पुत्रांना घेतले ताब्यात

सावंतवाडी पोलिसांनी बावळाट येथे गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी आजरा येथील पिता – पुत्रांना घेतले ताब्यात

सावंतवाडी पोलिसांनी बावळाट येथे गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी आजरा येथील पिता – पुत्रांना घेतले ताब्यात

ट्रकसह तब्बल १८ गुरे जप्त…

सावंतवाडी

गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी आजरा येथील दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई काल रात्री १ वाजण्याच्या सुमारास बावळाट तिठा येथे करण्यात आली. इसाक अब्दुल नेसरीकर आणि तौसिफ नेसरीकर (दोघे रा. आजरा जि. कोल्हापुर) अशी त्यांची नावे आहेत. यावेळी वाहतूक करण्यात येणारी तब्बल १८ गुरे जप्त करण्यास यश आले असून त्यांना फोंडा-गोवा येथील गो शाळेत हलविण्यात आले आहे. याबाबतची तक्रार वाहतूक पोलिस प्रशांत धुमाळे यांनी दिली आहे. त्यानुसार गुरे वाहतूक केल्या प्रकरणी त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्यांना नोटीसा देवून सोडून देण्यात आले, असे ठाणे अमंलदार आबा पिरणकर यांनी सांगितले.

कुडाळ येथून आंबोलीच्या दिशेने गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती काही तरुणांकडुन पोलिसांना देण्यात आली होती. त्यानुसार त्या दोघांना बावळाट तिठ्यावर सापळा रचून पकडण्यात आले. यावेळी त्यांच्या गाडीची तपासणी केली असता त्यात तब्बल १८ गुरे आढळून आली. याप्रकरणी त्या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच ट्रकसह त्यांच्या ताब्यात असलेली गुरे जप्त करण्यात आली. त्याच बरोबर ती गुरे गोवा येथील एका गो शाळेत पाठविण्यात आली, अशी माहिती आंबोली दुरक्षेत्राचे हवालदार जगदिश दुधवडकर यांनी दिली.

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा