You are currently viewing संवाद मीडियाने लक्ष वेधल्यानंतर रेडी कोलगाव कणकवली येथील जुगाराच्या बैठका बंद

संवाद मीडियाने लक्ष वेधल्यानंतर रेडी कोलगाव कणकवली येथील जुगाराच्या बैठका बंद

जुगाराची मैफिल बसली तर स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली शहराच्या आजूबाजूचा परिसर, सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव, त्याप्रमाणे वेंगुर्ले तालुक्यातील रेडी येथे जुगाराच्या खुलेआम बैठका बसत होत्या. संवाद मीडियाने सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरच्या सर्व बैठकांची पोलखोल करत जिल्हा पोलीस अधीक्षकांचे त्याकडे लक्ष वेधले होते. स्थानिक खाकीच्या नाकर्तेपणामुळे आणि स्थानिक खाकी वर्दीच्या आशीर्वादाने सदरच्या बैठका बसत होत्या, व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठकांवर धाड पडण्यापूर्वी स्थानिक खाकीच्या झारीतील शुक्राचार्यांकडून संबंधित जुगार्यांना सूचना दिली जात होती. त्यामुळे ज्या ठिकाणी जुगाराच्या बैठका बसायच्या तिथे धाड पडल्यानंतर काहीच आढळून येत नव्हते.
संवाद मीडियाने जुगाराच्या बैठकांवर नेहमीच आवाज उठविला आहे आणि रेडी, कोलगाव व कणकवली येथील बैठकांबाबत गेले काही दिवस सातत्याने मीडियामध्ये माहिती देत संबंधित जुगारांवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न केला होता. त्यामुळे सदर बातमीची दखल सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक आणि घेऊन ज्या ठिकाणी जुगाराच्या बैठका बसतील त्या ठिकाणच्या स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांवर आता कारवाईची टांगती तलवार असेल. त्यामुळे “एलसीबीची धाड पडेल तेव्हा बैठका बंद करा” अशा सूचना केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी जुगारासारख्या अवैद्य धंद्यांना साथ देण्याचे आणि आपली पोळी भाजून घेण्याचे काम खाकी वर्दीतील काही कर्मचाऱ्यांकडून होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जुगाराच्या बैठका बंद करायच्या असतील तर ज्या ज्या ठिकाणी जुगाराच्या बैठका बसतात त्या ठिकाणच्या स्थानिक खाकीवर्दीच्या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत्या अवैध धंद्याची गंभीर दखल घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक नक्कीच कडक कारवाई करतील अशी अपेक्षा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा