You are currently viewing उंबर्डे विद्यालयात बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत मार्गदर्शन

उंबर्डे विद्यालयात बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत मार्गदर्शन

महिला पोलीस हवालदार आरती राठोड यांची प्रमुख उपस्थिती

वैभववाडी
उंबर्डे येथील माध्यमिक विद्यालयात बाल अत्याचार प्रतिबंधक कायदा याबाबत जनजागृती कार्यक्रम पार पडला. तसेच वाहतुकीच्या नियमाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. वैभववाडी पोलीस ठाण्याच्या पो. हवालदार सौ..आरती राठोड व वाहतूक पोलीस श्री विलास राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सद्यस्थितीत घडणाऱ्या सायबर गुन्हे यांची अनेक उदाहरणाबाबत आरती राठोड यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापक एस.एम. बोबडे, विशाल पाटील, श्री. वाघमोडे, श्री. नाईक, श्री राठोड, सौ. पवार, श्री. कांबळे, श्री. पाटील, धर्मरक्षित जाधव, शांताराम हिरोजी, सुखदेव कोळी गजानन गवस व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + twelve =