You are currently viewing छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांचा निषेध; कारवाईची मागणी

छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांचा निषेध; कारवाईची मागणी

कणकवलीत मराठा समाजाने दिल्या निषेधाच्या घोषणा

कणकवली :

कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या च्या विरोधात कणकवलीत मराठा समाजाच्या वतीने या समाजकंटकाचा निषेध करण्यात आला. यावेळी कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्याची साफसफाई करत त्या समाजकंटकांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. तसेच या कृत्याचा ही मराठा समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला यावेळी, बबलू सावंत, सुशील सावंत, सुशांत दळवी, बच्चू प्रभुगावकर, भाई परब ,महेंद्र सांब्रेकर, लवू परब,पप्पू पुजारे,शिवा राणे भाऊ सावंत समीर प्रभुगावकर सर्वेश दळवी,स्वप्नील चिंदरकर,समीर परब, संदीप चव्हाण, संजय साळसकर बंटी सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा