You are currently viewing श्रीमती मनोरमा महादेव चौधरी चॕरीटेबल ट्रस्ट वालावल व प्रगत सिंधुदुर्ग मुंबई या संस्थांतर्फे वैभववाडीतील गरजूंना साहित्य वाटप

श्रीमती मनोरमा महादेव चौधरी चॕरीटेबल ट्रस्ट वालावल व प्रगत सिंधुदुर्ग मुंबई या संस्थांतर्फे वैभववाडीतील गरजूंना साहित्य वाटप

वैभववाडी

सिंधुदुर्गमध्ये झालेल्या वादळात वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे गावातील बाधितांना संस्थांतर्फे आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. वैभववाडी तहसीलदार कार्यालय येथे तहसीलदार श्री. रामदास झळके व संस्था अध्यक्ष श्री. दयानंद चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी तहसीलदार झळके यांनी, तालुक्यात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत या संस्थेतर्फे २०२०/२१ सन्मान पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी रविवार दिनांक ५ सप्टेंबर २०२१ रोजी करूळ घाटात झालेल्या भीषण अपघातात जखमीना विनामूल्य सेवा देत,कसाल पडवे हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाणारे एडगावचे रहिवासी श्री. हेमंत रावराणे यांचाही तहसीलदार यांच्यातर्फे शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला वैभववाडीचे नायब तहसीलदार श्री.अशोक नाईक व श्री.अमित निंबाळकर तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन. पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्री.राजू भालेकर यांचाही संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.तहसिलदार श्री.झळके यानीही संस्थेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. संस्थेमार्फत आर्थिक गरजू, शैक्षणिक विद्यार्थ्यांना जी मदत दिली जाते ते त्यांच्या जीवनासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. हे कार्य असेच सुरू राहून त्यांचे आशीर्वाद संस्थेसाठी मिळावेत हेही नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन ट्रस्टचे सचिव श्री.संदीप साळसकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × five =