You are currently viewing भाजप भटके विमुक्त आघाडी वेंगुर्ले तालुकाध्यक्ष पदी नाना कोळेकर यांची निवड

भाजप भटके विमुक्त आघाडी वेंगुर्ले तालुकाध्यक्ष पदी नाना कोळेकर यांची निवड

*भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांनी केली निवड जाहीर*

 

वेंगुर्ले :

भाजप भटके विमुक्त आघाडी वेंगुर्ले तालुका अध्यक्ष पदी खानोली येथील नाना कोळेकर यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सावंतवाडी वेंगुर्ले दोडामार्ग विधान सभा दौऱ्यावर असताना नियुक्ती पत्र प्रदान करत वेंगुर्ले तालुका कार्यालयात भटके-विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी ही निवड जाहीर केली.

याप्रसंगी बोलताना नवलराज काळे म्हणाले की गरीब , वंचित, उपेक्षीत शेवटच्या माणसाप्रती भाजपा ची असलेली भावना ही भाजपा च्या यशाचे गमक आहे. भाजप पक्ष हा बहुजनांचा, गरीबांचा, शोषीतांचा, पिडीतांचा, सर्वसामान्यांचा आहे. देशातील सर्वाधिक दलित, आदिवासी, ओबीसी, महिला या वर्गातील खासदार व आमदार भाजपाचे आहेत. या सामाजिक समरसतेमुळे, विश्वासामुळे भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त भटक्या विमुक्त जाती बांधव हे भाजपाच्या झेंड्याखाली आणन्यासाठी तालुकानिहाय दौरे करुन भाजपा वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर , नगराध्यक्ष राजन गीरप , मालवण तालुका भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष बाळा गोसावी , धनगर समाज जिल्हा अध्यक्ष दिपक खरात , जिल्हा उपाध्यक्ष अॅड सुषमा खानोलकर व सोमनाथ टोमके , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व बाळा सावंत , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , ता.उपाध्यक्ष – प्रीतेश राऊळ – मनवेल फर्नांडिस – लक्ष्मीकांत कर्पे , युवा मोर्चाचे संदीप पाटील – तुषार साळगांवकर – भुषण सारंग , उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर , नगरसेवक प्रशांत आपटे , ता.चिटणीस जयंत मोंडकर , जेष्ठ नेते प्रकाश रेगे , अॅड. जी.जी.टाककर , महिला मोर्चा शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर , महिला मोर्चाच्या – वृंदा गवडंळकर – वृंदा मोर्डेकर – आकांक्षा परब – सारिका काळसेकर , *शक्ती केंद्र प्रमुख* – महादेव नाईक ( आरवली ) – जगंन्नाथ राणे ( रेडी ) – संतोष शेटकर ( तुळस ) – नितीन चव्हाण ( वजराठ ) – कमलेश गावडे ( पाल ) – सुधीर गावडे ( वेतोरे ) – विजय बागकर ( आसोली ) – विद्याधर धानजी (शिरोडा ) – सुनील चव्हाण ( परुळे ) – रुपेश राणे ( कुशेवाडा ) – निलेश मांजरेकर ( उभादांडा ) , तुळस सरपंच शंकर घारे , प्रभारी ज्ञानेश्वर केळजी , शिरोडा शहर अध्यक्ष संदिप धानजी , ता.का.का.सदस्य सुनील घाग , खानोली उपसरपंच सुभाष खानोलकर , *बुथप्रमुख* – शेखर काणेकर – नारायण गावडे – पुंडलिक हळदणकर – वसंत परब इत्यादी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + 12 =