या धुंद सांजवेळी
या धुंद सांजवेळी...!!

या धुंद सांजवेळी

या धुंद सांजवेळी

तू माळलेला गजरा मोगऱ्याचा…
सुवास तो फुलांचा,,
वेडावतो मनाला..
या धुंद सांजवेळी..

तुझ्या रेशमी बटा केसांच्या..
उडता चेहऱ्यावरी..
शहारती तनाला..
या धुंद सांजवेळी..

नाजूक खळीस गालावरच्या,
खुललेली पाहताना..
खुणावते मनाला..
या धुंद सांजवेळी..

तो नाद तुझ्या पैंजणांचा..
कानाशी बोलताना..
बोलावतो मजला..
या धुंद सांजवेळी..

शृंगार तुझा यौवणातला..
नजरेने शोधताना..
लाजवतो नयनांला..
या धुंद सांजवेळी…
या धुंद सांजवेळी…!!

(दीपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा