You are currently viewing हत्तींचा मोर्चा पुन्हा तिलारी खोऱ्याकडे

हत्तींचा मोर्चा पुन्हा तिलारी खोऱ्याकडे

दोडामार्ग

तळकट पंचक्रोशीत धुडगूस घालणाऱ्या हत्तींनी पुन्हा एकदा आपला मोर्चा तिलारी खोऱ्याकडे वळविला आहे.  रविवारी रात्री या रानटी हत्तींनी पाळये गावात प्रवेश करून केळी, सुपारी बागायतींचे मोठे नुकसान केले .

काही दिवसांपूर्वी हा रानटी हत्तींचा कळप तळकट पंचक्रोशीत होता. तेथे त्यांनी बरेच नुकसान केले होते. त्यातील काही हत्तींनी पुन्हा एकदा आपला मोर्चा तिलारी खोऱ्यात वळविला आहे.  रविवारी रात्री या हत्तींचा कळप पाळये मध्ये फिरताना आढळला. गावात हत्ती आल्याची बातमी सर्व ग्रामस्थांनी एकमेकांना दिली. ग्रामस्थांनी आपल्या परीने या कळपाला हुसकावून लावण्यास सुरूवात केली. मात्र त्याचा म्हणावा तसा काहीही उपयोग झाला नाही उलट या कळपाने मोर्ले बागवाडीमधील शेतकरी विनायक मणेरीकर यांच्या पाळये गावात असलेल्या बागायतीत प्रवेश करून धुडगूस घातला.त्यांच्या बागायतीमधील ९० केळी व १०० सुपारीच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले .

प्रतिक्रिया व्यक्त करा

three − two =