You are currently viewing *|| स्वरधारा ||*

*|| स्वरधारा ||*

*ग्रामीण पत्रकार तथा लेखिका मेघा कुलकर्णी “मेघनुश्री” लिखित अप्रतिम लेख*

*|| स्वरधारा ||*

‘आरंभ’ अर्थातच प्रत्येक गोष्टीची सुरवात. (स्वरीत) या कार्यक्रमाद्वारे बरसणाऱ्या स्वरधारा एक अनोखा अनुभव आषाढ मासाच्या सुरवातीस मनमुराद घेता आला. एका शनिवार,रविवारी भारतीय विज्ञान संस्था बंगलोर येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. हा सोहळा पाहण्यास मन अत्यंत उत्सुक होते. कार्यक्रम पाहताना, ऐकताना लक्षांत असे आले की ही नुसती संगीत मैफल नाही तर मुख्य गायक – गायिकांना साथ देणाऱ्या कलाकारांचा तो सन्मान होता. त्यांच्या वाद्यवृंदाची संपूर्णतः माहिती या कार्यक्रमाद्वारे दिली जाते. आणखी एक वैशिष्ट्य जाणवले यामध्ये वाद्यवृंदाचा इतिहास, ती कशी बनवली आहेत, तत्कालीन कलाकारांनी त्याचा उपयोग संगीत साधनेसाठी कशा प्रकारे केला आहे हे अगदी आवर्जून सांगितले जाते. आरंभच्या प्रत्येक भागामध्ये अशी विविध वाद्यवृंदे व त्याबद्दल माहिती मिळत रहाते. त्यावेळी या कार्यक्रमात हार्मोनियम या वाद्याची उत्तम माहिती मिळाली. हार्मोनियम वादक श्री.व्यासकुमार कट्टीजी यांनी दोन्ही दिवस कार्यक्रमाच्या प्रमुख गायिका आदिती उपाध्याय यांना हार्मोनियमची उत्तम साथसंगत केली त्याचसोबत श्रोतृवृंदाला हार्मोनियमच्या माहितीने अखंड तृप्ती दिली. त्यांच्याकडून हार्मोनियमचे प्रकार सांगितले गेले.
या सर्व कलाकारांच्या स्वरांना नैसर्गिक आषाढसरींनीही सभागृहाच्या बाहेरून साथ केली. दोन्ही दिवस हा निखळ, निरागस आनंद घेता आला. यांत समोरून वापरायचा हार्मोनियम, एका बाजूने वापरण्यात येणारा हार्मोनियम असे प्रकार संगीतप्रेमींना माहिती झाले. त्यातही अजून वेगळे प्रकार असे श्री.कट्टीजी सांगितले १.नर-नर २. खर्ज-नर ३. मादी असे हे प्रकार सुरांना साथ देणारे. गायक / गायिका यांच्या आवाजांच्या विविधतेनुसार त्यांचा उपयोग केला जातो. गायक / गायिकांची गाण्याची पट्टी तशीच लकबही लक्षांत घेऊनच हार्मोनियम कलाकाराला कोणता प्रकार कधी उपयोगात आणायचा हे त्या त्या कार्यक्रमानुसार ठरवावे लागते. मराठी नाट्यसंगीतांसाठी पूर्वीच्या काळी वापरले जाणारे हार्मोनियम पहायला मिळाले त्याचा आकारही मोठा होता व ते पायांनी वापरले जायचे. या कार्यक्रमांत संभाषणाद्वारे, प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून श्री.कट्टीजी माहिती देत होते ती अशी की काही नामवंत कलाकार त्यांचा स्वत:चाच हार्मोनियम कार्यक्रमाकरिता सोबत नेत असत देशांत कुठेही गाण्याच्या कुठेही गाण्याच्या मैफलीस जाताना.
कट्टी यांनी त्यांच्या हार्मोनियमच्या वरील भागांतील एका बाजूला लाकडी पट्टीखाली वस्त्राची घडी ठेवली असे लक्षांत येताच प्रेक्षकातून त्याबद्दल त्यांना प्रश्न विचारला गेला. त्यांनी ते वस्त्र बाजूला काढून हार्मोनियम वाजवून दाखवले. तर त्याच्या आवाजाचे [ध्वनीचे] प्रमाण एकदम वाढले. हे सर्व माहित होत असताना आणखी एक मुद्दा समोर आला तो असा की देशांत सर्वठिकाणी कार्यक्रम करत असताना, प्रत्येक प्रांतात हवामान वेगळे त्याचा या वाद्यवृंदावर कितपत परिणाम होत असेल, त्याचेही श्री.कट्टी यांनी समाधानपूर्वक उत्तर दिले. या सर्व वातावरणाचा विचार करूनच वाद्यवृंदे बनवली जातात. त्यांचे हार्मोनियम मुंबईतून बनवून घेतले आहे असेही सांगितले. जेव्हा कार्यक्रम सांगता होते तेव्हा हार्मोनियम बंद करताना पूर्ण हवा काढून टाकण्याची काळजी घेतली जाते. आता सुधारिक हार्मोनियम घडीचे असल्यामुळे कुठेही नेणे-आणणे सोपे झाले आहे असे कलाकारांचे म्हणणे आहे. दोन संध्याकाळी सुरांमध्ये मंत्रमुग्ध झाल्या. या कार्यक्रमात सागर भारद्वाज यांनी तबला साथ केली. तसेच एक स्त्री कलाकार सतारीची साथ करत होत्या. सभागृहातील या चार कलाकारांनी सजवलेले सूर पाहून जणू “प्रेक्षकांच्या मुक्या भावनांना शब्दरूप” प्राप्त झाले होते.
मेघनुश्री : लेखिका,पत्रकार
मोबाईल ७३८७७८७५१२
ईमेल – megha.kolatkar 21@gmail.com

 

*संवाद मिडिया*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*
*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*🏭यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏭*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *💯 नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक

*उपलब्ध कोर्सेस*👇

🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिंग
🔹 कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

*📖प्रमुख वैशिष्ट्ये📖*

*❇️3 वर्षांचा अभ्यासक्रम📖*
*❇️अनुभवी व तज्ञ प्राध्यापक🕺🏼*
*❇️उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
*❇️उत्तम निकालाची परंपरा🤷‍♂️*
*❇️नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार*🤝
*❇️💯 नोकरीची हमी👍🏻*
❇️ *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शासकीय फी सवलत💸*
🆓 *SC/ST* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण🆓*
*🚌बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…📝*

*भेट द्या –👇🏻*
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, ता.सावंतवाडी*
*जि. सिंधुदुर्ग*
*www.sybespolytechnic.com*
*संपर्क -*
*☎️02363273535/273456*
*📲मोबा.9404598060*

*आमची प्रवेश केंद्रे -:*

*कुडाळ प्रवेश केंद्र*
माने-जी क्रिएशन, पीएनबी बँकेजवळ, कुडाळ, ता.कुडाळ
9403053303 / 9403163639

*माणगाव प्रवेश केंद्र*
कदम कॉम्प्लेक्स, हायस्कूल रोड, माणगाव तिठा, माणगाव, ता.कुडाळ
9421718850 / 9158510198

*वेंगुर्ला प्रवेश केंद्र*
हायटेक कॉम्प्युटर, जि प शाळा नंबर 3 जवळ, वेंगुर्ला, ता.वेंगुर्ला
9403101880 / 8879433307/ 9964056383

*मळेवाड प्रवेश केंद्र*
श्री गणेश मंदिराजवळ, मळेवाड तिठा, मळेवाड, ता.सावंतवाडी
9422810151 / 9175017071

*दोडामार्ग प्रवेश केंद्र*
शॉप नं.4, टोपले कॉम्प्लेक्स, बॉम्बे टेक्सटाईलच्या मागे, बाजारपेठ दोडामार्ग, ता.दोडामार्ग
9130003477 / 9145705988 / 9405990211

*Advt Link*
https://sanwadmedia.com/98446/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा