You are currently viewing गुंता……!
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

गुंता……!

*वक्रतुंड साहित्य समूह प्रशासक लेखक कवी जगन्नाथ खराटे लिखीत अप्रतिम समाजप्रबोधन पर लेख..*

*गुंता……!*

लहानपणीची गावची गोष्ट, त्यावेळी मी अगदी लहान होतो,चारपाच वर्षाचा असेन.‌तेंव्हांचं थोडंसं आठवतं.त्यावेळी अंथरुण पांघरुण म्हणून आईने हातांनी शिवलेली गोधडी असे.अन आई ती गोधडी घरीच शिवायची. तर गोधडी शिवायला जाडसर सुती धाग्याचं बंडल घेऊन येई अन् ते भिंतीच्या कोनाड्यात ठेवीत असे. एकदा आईच्या नकळत पंतग ऊडवायचं म्हणून आम्हीते धाग्याचं बंडल घेऊन जायचो अन् मस्तपैकी पतंग उडवुन तो धागा कसातरी ऊलटासुलट गुंडाळून ते पुन्हा कोनाड्यात ठेवुन देत असु.. पन्. आईला फाटलेले कपडे शिवायची आठवंन झाली अन् ती कोनाड्यातलं ते बंडल घेवून पाहू लागली. तेव्हा तिच्या लक्षात आलं की हे मुलांनी पतंग उडवायला घेतलं आहे.अन् कसंतरी लपेटलेल्या त्या धाग्यांचा भलामोठा गुंता झाला होता.. ती रागाने लाल होवुन आमच्यावर ओरडली व चारपाच धपाटे मारुन, शांतपणे तो धाग्यांचा गुंता सोडवु लागली..


हे सर्व आठवण्याचं कारण म्हणजे, सद्ध्याची परिस्थिती… सद्ध्याच्या काळांत अनैक समस्या अन् संकटाचे भलामोठे गुंते आपल्या अवतीभवती आहेत,अन् ते सोडवताना होणारी जीवघेणी दमछाक खरंच डोकं तापवणारी ठरत आहे.. तेव्हाचा तो धाग्यांचा गुंता पाहून आईचं रागावणं खरोखरच अगदी बरोबर होतं असं वाटुन लागतं…..

खरंतर, गुंता म्हणजे अनेक समस्यांचं भलंमोठं‌ गाठोडं.. अन् ह्या समस्या आपोआप निर्माण होंत नाही काही तरी कारण असतं त्या पाठिमागे, मग त्या हळूहळू मोठ्या होतं जातांत अन्, रौद्र रूप धारण करतात. बर्याच समस्या ह्या निसर्ग निर्मित असतात. तर काही मानवनिर्मित म्हणजे इतरांकडून निर्माण होतात ..तर कधी कधी ती आपनंच स्वतः निर्माण करीत असतो. अशा अनेक समस्यां एकत्र येऊन त्याचा भलामोठा गुंता तयार होतो, अन् तो सोडवताना मात्रं अगदी नाकीनऊ, येतात.‌.


बाहेरच्या जगात, किंवा समाजात दारिद्र्य ,बेकारी, उपासमार इत्यादी समस्या तर अगदी सदैव‌ ठाण मांडुन बसलेल्या असतात, तर निसर्गात, अवर्षण तर कधी महापुर, रोगराई इत्यादी निसर्गनिर्मित समस्या मानसाचा पाठपुरावा करीत जीवन सळो की पळो करून सोडत असतात, अशा बाहेरच्या जगातील हृया अनेक समस्यांचे गुंते सोडविण्यासाठी मानसाचं आयुष्य पणाला लागतं..

पन् ह्याही पेक्षा प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनातल्या समस्यांचे गुंते तर अधिक बिकट असतात,मनुष्य जन्मतो तै अनेक गुंते सोडविण्यासाठींच.. आईबाबां, भाऊ बहिण, नंतर काका काकू, मामा, इ नातेसंबंध आपोआपच जुळतात अन् त्या नातेसंबंध टिकवण्या साठी तर त्याला तारेवरची कसरत करावी लागते, कुणाचही मन दुखावलं जावु नये हृयासाठी अगदी आपलं मन मारुन जगावं लागतं.नातेसबंधाचे गुंते हे अगदी शांतपणे सोडवावे लागतात तेव्हा नातेसंबंध टिकुन राहतात..

हे तर ला़बचं झालं.पन जेव्हा आईवडील आपल्याला जोडीदार शोधुन देतो अन् आपन संसाराला लागतो तेव्हा,तर एक भलीमोठी जबाबदारी येवुन पडते. सौभाग्यवतीचं मन राखण्यासाठी तिला कुठलाही त्रास होता कामा नये हे तर फार मोठी जोखीम असते अन् दोन मन जुळुन ठेवण्यासाठी आपलं कौशल्य पणाला लागतं.. पुढे मुलबाळ.. अन् त्यांच्या जबाबदार्या हृया अशा अनेक समस्यांचे अंनेक गुंते सोडविण्यातंच आयुष्य सार्थकी लागतं..
हे सर्व गुंते सोडविण्यासाठी मला बालपणी, आईची ती गोष्ट अगदी मनापासून आवडली. अन् ती म्हणजे तिची स्थितप्रज्ञपने शांत राहून एकेक गुंता सोडवण्याची हातोटी, खरंच किती सोपी गोष्ट आहे ती! पन् वरवर सोपी वाटणारी गोष्ट खरोखरच सोपी नसते. कारण स्थितप्रज्ञपना, अन‌् शांतपणे कर्म करणे हे वाटते तेवढे सोपे नाही.. त्यासाठी लागतं सातत्य अन् मनाची अढळ शांती..
अन्, सद्ध्याच्या काळात ह्या दोन्ही गोष्टींची कमतरता आहे.. सातत्य अन् मनाची शांतता हरवल्याने जगात अनेक समस्यांच्या गुंत्यात तो हरवला आहे.अन मानसीक संतुलन हरवुन बसलाय, खोट्या क्षणिक सुखासाठी तो अनेक समस्या निर्माण करुन अधिकाधिक जटीलगुंते निर्माण करुन स्वतःचं आत्मसुख हरवुन बसलाय अन् गुंत्यातुन बाहेर पडण्यासाठी केविलवाणी धडपड करीत आहे हे आजंंच वास्तव आहे…

जगन्नाथ खराटे -ठाणे

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − four =