You are currently viewing कुडाळात एस. आर. दळवी फाऊंडेशनचा स्नेहबंध मेळावा

कुडाळात एस. आर. दळवी फाऊंडेशनचा स्नेहबंध मेळावा

कुडाळ :

 

आज रविवार दिनांक १८ जून रोजी सकाळी अकरा वाजता कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या सिंधुदुर्ग टीचर्स टॉक फोरमच्या वतीने जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते शिक्षक बांधवांचा स्नेहबंध मेळावा आयोजित केला होता. शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी सदैव कार्यतत्पर असणाऱ्या एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या वतीने सातत्याने नवनवीन उपक्रम हाती घेऊन शिक्षकांचे उद्बोधन व प्रबोधन केले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एस. आर. दळवी फाउंडेशनच्या सर्व शिक्षक बांधवांचा स्नेह मेळावा रविवारी आयोजित केला होता. या मेळाव्यास फाऊंडेशनचे संस्थापक श्री. रामचंद्र उर्फ आबा दळवी व श्रीमती सीता दळवी तसेच संस्थेचे मुकख्य संचालक डॉ.नयन भेडा हे देखील उपस्थित होते.

या संमेलनाचे अध्यक्षस्थान जिल्हाध्यक्ष सचिन मदने यांनी भूषविले. दरम्यान कार्यक्रमांस उपस्थित सर्व शिक्षकांनी आगामी काळात वृक्ष संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे नमूद करुन पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. कार्यक्रमात एस. आर. दळवी फाऊंडेशन महाराष्ट्र प्रदेश राज्याध्यक्षपदी महेश सावंत यांची निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग टीचर्स टाॅक फोरमकडून जिल्हाध्यक्ष सचिन मदने, जिल्हासरचिटणीस विजय गावडे व सिंधुदुर्ग टीमकडून तुळशीचे रोप देऊन अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमात सर्व नवनियुक्त सदस्यांचा परिचय, ओळखपत्र व नियुक्ती पत्रांचे वितरण केले गेले. एस. आर. दळवी (आय) संस्थेचे राज्य पदाधिकारी महेश सावंत यांनी सर्व शिक्षकांना संस्थेचा इतिहास व सांगून संस्थेमार्फत होणाऱ्या विविध उपक्रमांबाबत सर्व उपस्थित शिक्षकांना माहिती दिली तसेच सन २०२३-२४ साठी वार्षिक उपक्रम नियोजन या विषयावर चर्चा करण्यात आली. त्यांनतर फाऊंडेशनचे संस्थापक आबा दळवी, श्रीमती. सीता दळवी व मार्गदर्शक डॉ. नयन भेडा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

दरम्यान, आबा दळवी यांनी सर्व नवनियुक्त सदस्यांचे फाऊंडेशनमध्ये स्वागत केले व त्यांना पुढील कामकाजसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाची सांगता करताना संस्थेचे जिल्हाध्य्क्ष सचिन मदने त्यांचे मनोगत व्यक्त केले. या सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उपस्थित सर्व शिक्षकांना पुढील वर्षभरात विविध कार्यक्रम शिक्षक तसेच विद्यार्थी यांच्यासाठी राबविले जाणार आहेत. शिक्षकांसाठी ऑनलाईन वेबिनार, विविध स्पर्धा आयोजित केले जातील. यात जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. सूत्रसंचालन प्रसाद गावडे व सौ. ताम्हणकर मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय गावडे यांनी केले. सर्व उपस्थित शिक्षकांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता ॠदयनाथ गावडे यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा