*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकार आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अद्भुत रहस्य मनुजन्माचे*
या जन्मावर खूपप्रेम करोनि
सार्थक करावे मनुजन्माचे
अद्भुततेची देणगी मिळाली
झोळीत वरदान परमात्म्याचे.
कृतकृत्य व्हा प्रेमळ सहजतेने
सजग ,सक्षमअसा सत्कर्माने ,
सर्व प्राणिमात्रात श्रेष्ठत्व कां
मनुजा दिधले तुज नियतीने.
ज्ञान बुद्धी चे वरदान मिळाले
सौंदर्य, कलेची जाणीव तुजला
पंचेंद्रियाचा अर्थ तुला उमगला
कर्माने तू मानव जन्मासी आला
बौद्धिकतेने प्रगतीची वाट चाले
कलात्मक सौंदर्याचीखुलीदालने
भावश्रद्धेने धार्मिकतेची प्रार्थना
सर्वांग सुंदर मनुजन्माचे हे लेणे
सृष्टी वर तुझे कर्तव्य पारपाडणे
भोगउपभोगाचा, ऋणसापळा
गतजन्माचा होई,हिशोब चुकता
आत्ममोक्षा मिळे मार्ग मोकळा
स्वरचित
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
विरार
