You are currently viewing नारी कथा

नारी कथा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योती कुळकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*नारी कथा*

 

नवीन युगात

आईच्या कुशीत

हळुच प्रवेश!

आईला म्हणाले

येते ग फिरून,

इकडे तिकडे

फिरले बुंदेल!

मागील जन्मात

नसे गर्भपात

पण माहितीय?

गोंडस हं नाव

बच्ची दूधपिती!

आता? गर्भपात!

बंदी त्यावरही!

आलीय जन्माला?

दिल्लीची बातमी!

दोन महिन्यांची

आईला नकोशी

काय केल तिने?

टाकल भट्टीत

आई ग!आई ग!

अजून संपेना

का मला छळणे?

कुठले शतक?

काय ही प्रगती?

काय मनोवृत्ती?

संपता संपेना!

माझा छळवाद!

ठरवल मीच

माझी मीच उभी

रहाणार आहे

दाखवाया शक्ति!

सांगेल जगाला

कशी मी सशक्त

परिणाम याचा

सगळेच क्षेत्र

केले पादाक्रांत

सगळ्या विश्वात

झेंडा स्त्री शक्तिचा!

संदेश देईन

नवीन युगाचा

सशक्त नारीचा

विश्वाच्या शांतीचा!

आईला म्हणाले

येऊ दे जन्माला!

 

ज्योती कुळकर्णी.

प्रतिक्रिया व्यक्त करा