You are currently viewing हिरवे झाड

हिरवे झाड

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*हिरवे झाड* 

 

हिरवे हिरवे बीज पेरले

अंकुरले रोपटे हिरवे

हिरव्या हिरव्या रोपट्याला

पाने लागले हिरवे हिरवे

 

हिरव्या हिरव्या रोपट्याला

पाणी दिले भरपूर

हिरवे हिरवे रोपटे

वाढू लागले भुरभुर

 

उंची वाढली फांद्या वाढल्या

झाड लागले फुलू

वाऱ्याच्या झोतात

झाड लागले डोलू

 

हिरव्या हिरव्या पानांनी

बहरले हिरवे झाड

हिरव्या हिरवाईत

शोभले हिरवे झाड

 

हिरव्या हिरव्या झाडाची

सावली छान छान

सावली खाली बसले

पशुपक्षी थोर लहान

 

हिरव्या हिरव्या झाडावर

फुले आली रंगीत

फुलांच्या मोहात किटक

गाऊ लागले संगीत

 

हिरव्या हिरव्या झाडाला

ताजी हिरवी फळे

फळे पिकल्यावर ताव मारू

लागले पशुपक्षी सगळे

 

हिरव्या हिरव्या झाडाची

महती किती महान

एक हिरवे झाड

देई आम्हा जीवनदान

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

7588318543.

प्रतिक्रिया व्यक्त करा