You are currently viewing खरा तो एकची धर्म

खरा तो एकची धर्म

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित गुरूनानक जयंती मानवतेचा संदेश देणारी अप्रतिम काव्यरचना*

 

 *खरा तो एकची धर्म*

 

तहानलेल्याला पाणी

भुकेल्याला द्यावे अन्न

मानवता नाव त्याचे

ईशरुप ते प्रसन्न….!!

 

निरक्षरास करावे साक्षर

शिक्षण विद्यादान करावे

रिकाम्या हातांना सदा

गुंतवणारे काम‌ द्यावे….!!

 

ह्रदयाशी सदा धरा

जगी रंजले गांजले

पाठीवर ठेवा हात

दु:ख मनाचे विझले….!!

 

अन्यायाची उडता ठिणगी

पाणी घाला सौहार्द्राचे

नको आग नको धूर

मूळ गाडावे द्वेषाचे….!!

 

एक रक्त सर्वांमधे

एक मनी संवेदना

मानवता धर्म आमुचा

सारे आपलेच म्हणा…!!

 

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

अरुणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा