You are currently viewing काव्यपुष्प- १४ वे

काव्यपुष्प- १४ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरुण वि. देशपांडे लिखित श्री.गोंदवलेकर महाराज काव्यचरितावली-*

 

*काव्यपुष्प- १४ वे*

——————————–

काशीहुनी श्रीमहाराज अयोध्येस आले

संन्यासी महाराजांनी भेटीत सांगितले

तुजला जी हवी विद्या, ती देणारा गुरू मी नव्हे

गुरूंच्या शोधार्थ तू अजून दुसरीकडे जावे ।।

 

श्रीमहाराज नैमिषारण्यात आले, त्यांना दिसले

इथे निबिडशा अरण्यात दिवसा रात्र वाटते

अनेक तपस्वी इथे ध्यानस्थ बसलेले दिसले

कंदमुळे सेवनावर श्रीमहाराज इथे राहिले ।।

 

तिथून ते बंगाल प्रांतात काही दिवस राहिले

इथे ही “आत्मज्ञानाचा अधिकारी व्यक्ती ”

दिसला नाही , भेटलाही नाही, श्रीमहाराज

तिथून कलकत्ता शहरी जाण्यास निघाले ।।

 

श्रीगुरूंच्या शोधार्थ मनाची तळमळ ,विश्वास

म्हणे कवी अरुणदास,असा असावा ध्यास ।।

————————————-

कवी अरुण दास- अरुण वि.देशपांडे-पुणे

9850177342

—————————————–

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 3 =