You are currently viewing जे न देखे रवि … ते …

जे न देखे रवि … ते …

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

जे न देखे रवि … ते …

जे न देखे रवि ते देखे कवी
म्हणे “केशवसुत” अज्ञात प्रदेशात
प्रतिभा जावी…
कविता म्हणजे, अज्ञाताचा शोध
ज्ञाताच्या पलीकडे कवीची झेप हवी …

अज्ञात प्रदेशातील सुंदर रत्ने
पृथ्वीवरती आणू, धरा सजवू
या रत्नांनी पृथ्वीला स्वर्ग बनवू …

असे म्हणती थोर दिग्गज कवी
किती अशा कवींची साक्ष काढावी
कविता म्हणजे मनोरम मनोभाव
गुंतते मती नि भरती जखमांचे घाव …

कविता म्हणजे जगण्यास मिळावे बळ
आहे नितळ झरा वहावा तो खळखळ
कविता म्हणजे धुराडे मनाचे, निघून जावी
मनातील वाफ..
किल्मिष मनातील जाऊन मन व्हावे निर्मळ साफ …

प्रतिभेचे पंख जाती क्षितिजापार
ना अटकाव करू शके कोणी
प्रतिभा, कवीमनाची राणी
क्षितिजावरील रंग गंध ….
मनामनांना सुखावण्यास आणि ….

जगतास व्यापून उरली कविता
फुलविले किती सुखाचे मळे
हे कविते, तुझ्यामुळे किती तरी जीवांना
जगण्याचे बळ मिळे …

थोर उपकार तुझे कविते
तुझ्यामुळे म्हणवितो कवी
तू काय आहेस याची साक्ष
अजून कशाला हवी ?

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २४/०९/२०२२
वेळ : दुपारी १/३५

Advertisement

*🏡 साईकृपा कन्स्ट्रक्शन 🏠*
*🏘️ A to Z बिल्डींग मटेरियल सप्लायर्स 🏘️*

*प्रोप्रा – राजू मानकर*

*संपर्क 👇*
*📲 मो.9422435601 | 9225784966 | 9561344739*

*💫चिरा, वाळू, खडी, स्टील, सिमेंट, विटा, डबर योग्य दरात मिळेल. काँक्रीट हाॅट मिक्सर, रोड रोलर, जे.सी.बी. जॅक, स्पॅन भाड्याने मिळेल*

*💫सेंट्रींग प्लेट मिळतील.*

*🚰बांधकामासाठी लागणारे पाणी कामावर पोच मिळेल.*

*💫🚗 🚚कार व टेम्पो भाड्याने मिळेल*

*🏡आर.सी.सी. व लोड बेअरींग बंगल्यांची कामे करून मिळतील.*

*🏬सना कॉम्प्लेक्स, आचरा रोड, पोस्ट ऑफिस समोर, कणकवली*

*☎️ ऑफिस*
*9604180156 / 7350288777*

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 3 =