You are currently viewing आरोग्यदायी खाद्यसंस्कृतीचा नवा अध्याय! कुडाळमध्ये ‘नीलम नक्षत्र’ची ग्राहकांना पर्वणी
Oplus_16908288

आरोग्यदायी खाद्यसंस्कृतीचा नवा अध्याय! कुडाळमध्ये ‘नीलम नक्षत्र’ची ग्राहकांना पर्वणी

निवासापासून विविध खाद्यपदार्थांपर्यंत सहा स्वतंत्र फूड आउटलेट्सचा अनोखा अनुभव; पारंपरिक खाद्यतेल, ताज्या भाज्या, नैसर्गिक मसाले आणि स्वच्छतेचा विशेष आग्रह

कुडाळ : हॉटेलमध्ये केवळ रुचकर खाद्यपदार्थ मिळणे एवढेच महत्त्वाचे नसून, त्यासोबत आरोग्य, स्वच्छता आणि उत्तम आदरातिथ्याचा अनुभव मिळणेही तितकेच आवश्यक आहे. याच संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवत कुडाळमध्ये हॉटेल नीलम नक्षत्रने हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पर्यटन, व्यावसायिक कामकाज तसेच कौटुंबिक सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांना निवास आणि विविध खाद्यसंस्कृतींचा आनंद एकाच छताखाली घेता येत असल्याने हे हॉटेल ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.

एकाच इमारतीत २७ आलिशान खोल्या आणि सहा स्वतंत्र फूड आउटलेट्स ही या हॉटेलची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. ग्राहकांसाठी डिलक्स, स्वीट आणि फॅमिली रूमचे पर्याय उपलब्ध आहेत. तसेच Jusjaas, QuadrO, Rohini, Kaffa, Thali De Tall आणि Pablo Escobar या सहा फूड आउटलेट्सच्या माध्यमातून विविध खाद्यसंस्कृतींचा आस्वाद घेता येतो. प्रत्येक आउटलेटची स्वतंत्र खाद्यसंकल्पना आणि वातावरण असल्याने ग्राहकांना एकाच ठिकाणी वेगवेगळ्या चवींचा अनुभव घेण्याची संधी मिळते.

या हॉटेलचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेसोबतच आरोग्य आणि स्वच्छतेला दिलेले प्राधान्य. खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम खाद्यरंगांचा वापर केला जात नाही. रिफाइंड तेलाऐवजी पारंपरिक घाण्याच्या तेलाचा वापर केला जातो. तसेच ताज्या फळभाज्या आणि नैसर्गिक मसाल्यांचा वापर करून खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि चव टिकविण्यावर भर दिला जातो. लहान मुलांच्या आवडी, सुरक्षितता आणि आरोग्याचा विचार करून चाइल्ड सेंट्रिक हॉटेल ही संकल्पनाही राबविण्यात येत आहे.

ग्राहकांना हॉटेलच्या स्वयंपाकघराची प्रत्यक्ष पाहणी करता यावी, यासाठी किचन टूरची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे स्वयंपाकघरातील स्वच्छता आणि पारदर्शकतेचा अनुभव ग्राहकांना घेता येतो. याशिवाय अल्कलाइन वॉटरची सुविधा देण्यात आली असून, हॉटेलची कार्यप्रणाली एफएसएसएआयच्या निर्धारित मानकांनुसार आहे. हॉटेलला ISO प्रमाणपत्रही प्राप्त आहे.

ग्राहकांना सातत्याने दर्जेदार सेवा मिळावी, यासाठी कर्मचाऱ्यांचे नियमित ब्रीफिंग, मीटिंग आणि प्रशिक्षण घेतले जाते. स्वच्छता, खाद्यपदार्थांची गुणवत्ता, ग्राहकांचे समाधान आणि आपुलकीचे आदरातिथ्य यावर व्यवस्थापनाकडून विशेष लक्ष दिले जाते.

केवळ खाद्यपदार्थांची चव नव्हे, तर आरोग्यदायी खाद्यसंस्कृती, स्वच्छता, गुणवत्ता आणि पारदर्शकतेच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न हॉटेल नीलम नक्षत्रकडून केला जात आहे. यामुळे कुडाळच्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात या हॉटेलने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

याप्रसंगी स्निग्धा बाम्बुळकर (फ्रंट ऑफिस व्यवस्थापक), मॉन्टी पनवार (खाद्य व पेय विभाग व्यवस्थापक), सचिन बालदवा (सल्लागार) आणि गौरव मुंज आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा